- कचरा कॅफेमध्ये साठवलेल्या प्लास्टिकचे पुनर्चक्रण केले जात आहे आणि ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आणि नवीन रस्ते तयार करण्यासाठी वापरतात.
- छत्तीसगडच्या अंबिकापूरमधील कचरा कॅफेबद्दल योग्य पद्धतीने अभ्यास केल्यानंतर अशीच यंत्रणा देशातील बर्याच शहरांमध्ये विकसित केली जात आहे.
- छत्तीसगडमधील अंबिकापूरला त्यावर्षी इंदूरनंतर देशातील दुसरे सर्वात स्वच्छ शहर म्हणून नावाजले गेले .छत्तीसगडमधील अंबिकापूर रस्ते तयार करण्यासाठी प्लास्टिक कचर्याचा वापर करतात. अंबिकापुरात उघडलेले कचरा कॅफे शहरातील मुख्य बसस्थानकात बांधण्यात आले .
- अंबिकापूरचे नगराध्यक्ष अजय तिर्की म्हणाले की, या योजनेमुळे शहराला प्लास्टिक कचरामुक्त करण्यात तसेच रस्त्यांच्या बांधणीत प्लास्टिकचा वापर करण्यास बरीच मदत होईल.OMG: My country is changing! ‘Garbage Cafe’! A full meal on a kilo of plastic; More the waste better the Taste
विशेष प्रतिनिधी
अंबिकापूर : कधी ऐकलं आहे का ‘कचरा लाओ खाना खाओ’! नाही ना !चला तर आज आम्ही तुम्हाला नेणार आहोत अशाच आगळ्या वेगळ्या कॅफे मध्ये जीथे प्लास्टिक कचरा दिल्यानंतर मिळते पोटभर जेवण .काय म्हणालात? OMG ! होय तर असा कॅफे आहे छत्तिसगढ़मध्ये चला तर पाहूया कसा आहे हा प्लास्टिक लाओ खाना खाओ वाला कॅफे .OMG: My country is changing! ‘Garbage Cafe’! A full meal on a kilo of plastic; More the waste better the Taste
प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होत असते. शिवाय प्लास्टिक नष्ट होत नसल्याने त्याची विल्हेवाट लावावी कशी याची अनेक शहरांना डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, प्लास्टिकचा कचरा काही कमी होताना दिसत नाही. छत्तीसगडच्या अंबिकापूर नगर पालिकेनेही एका कॅफेच्या माध्यमातून एक शक्कल लढवली आहे. India’s first garbage cafe opened in Chhattisgarh
अंबिकापूरमध्ये दोन वर्षापूर्वी एक ‘गार्बेज कॅफे’ सुरू झालं. विशेष म्हणजे अंबिकापूर नगर पालिकेने हे गार्बेज कॅफे सुरू केलं. या कॅफेमध्ये पैसे दिल्यावर नव्हे तर एक किलो प्लास्टिक दिल्यावर जेवणाची थाळी मिळते. तर अर्धा किलो प्लास्टिक दिल्यावर नाश्ता मिळतो. गोरगरीबांना जेवणाची सोय व्हावी म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे.
नंतर या प्लास्टिकची रिसायकलिंग केली जाते. प्लास्टिकचा कचरा नष्ट व्हावा आणि त्यामुळे पावसाळ्यात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून प्लास्टिक गोळा करण्याचा नगर पालिकेने हा अभिनव मार्ग निवडला आहे. तसेच गोळा केलेल्या प्लास्टिकचा उपयोग रस्ता बनविण्यासाठी करण्यात येत आहे. अंबिकारपूरचा हा प्रयोग अभ्यासाचा विषय झाला आहे. तसेच हा प्रयोग आता देशभर अनेक ठिकाणी राबवला जात आहे.
राज्य सरकारने अंबिकापूरमध्ये ‘गार्बेज कॅफे’साठी सुरुवातीला पाच कोटींची तरतूद केली होती. जे लोक प्लास्टिक गोळा करतात, अशा बेघरांना राहण्यासाठी जागा देण्याचीही त्यात तरतूद आहे. तसेच गोळा केलेल्या प्लास्टिकपासून नगरपालिकेने रस्ते बनविण्याचे कामही हाती घेतले आहे.
८ लाख प्लास्टिकच्या माध्यमातून नगर पालिकेने एक रस्ताही बनविला आहे. प्लास्टिक आणि असल्फेटच्या मिश्रणातून हा रस्ता बनविण्यात आला आहे. इतर रस्त्यांपेक्षा प्लास्टिकपासून बनविण्यात आलेला हा रस्ता दीर्घकाळ टिकत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.OMG: My country is changing! ‘Garbage Cafe’! A full meal on a kilo of plastic; More the waste better the Taste
पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आणि शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी गार्बेज कॅफे सुरू करण्यात आला आहे. या प्लास्टिकच्या माध्यमातून रोड बांधण्यात आला आहे.
दिल्लीतही प्रयोग
बेघरांना जेवण आणि निवारा देण्यासाठी देशातील अनेक शहरांनी पुढाकार घेतला आहे. दिल्लीच्या साऊथ एमसीडीनेही छत्तीसगडच्या धर्तीवर एक योजना राबवली आहे. दिल्लीतही कॅफे सुरू करण्यात आले असून एक किलो प्लास्टिक दिल्यानंतर जेवणाची थाळी आणि अर्धा किलो प्लास्टिक दिल्यावर नाश्ता दिला जात आहे. दिल्लीत दोन ठिकाणी हे कॅफे सुरू करण्यात आलं आहे. India’s first garbage cafe opened in Chhattisgarh