• Download App
    OMICRON: देशातील रूग्णसंख्या 400 पार ! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा उच्चांकOmaicron peaks in Maharashtra

    OMICRON: देशातील रूग्णसंख्या ४०० पार ! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा उच्चांक

    कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. देशभरात देखील दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय.

    देशातील एकूण 17 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. तर आता संपूर्ण देशभरात ओमायक्रॉमन रूग्णांची संख्या 422 वर जाऊन पोहोचली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या विक्रमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज दिवसभरात नव्या 31 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 141 रुग्णांची नोंद आहे.Omaicron peaks in Maharashtra

    राज्यातील 31 पैकी 27 रुग्णांचं निदान एकट्या मुंबईत झालं आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईतील कोरोना रुग्णवाढही चिंताजनक मानली जाते आहे.

    बीएमसीनं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 922 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण 326 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    सध्या मुंबईत कोरोनाचे एकूण 4295 सक्रिय रुग्ण आहेत.

    भारतातील 422 पैकी 108 ओमायक्रॉनची प्रकरणं ही एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर गुजरात आणि तेलंगणामध्ये रुग्ण आढळून आले आहेत.

    Omaicron peaks in Maharashtra

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार