• Download App
    दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी; पण निवडणुकीत उतरले आई + बापचं मैदानी!!|Old mother and fathers are struggling for their son's and daughter's political future

    दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी; पण निवडणुकीत उतरले आई + बापचं मैदानी!!

    नाशिक : दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, पण निवडणुकीत उतरले आई – बापचं मैदानी!!… अशी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि इंडी आघाडीतल्या घटक पक्षांची दिसते आहे.Old mother and fathers are struggling for their son’s and daughter’s political future

    याची कहाणी अशी :

    दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी!!, या काव्याची पोस्ट काही महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून केली होती. प्रत्यक्षात बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवताना दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी ठरण्याऐवजी बापचं लेकीसाठी मैदानात उतरल्याचे चित्र दिसले.



    शरद पवारांनी आपल्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये बारामतीत जेवढे कष्ट घेतले नव्हते, तेवढे कष्ट त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या 2024 च्या निवडणुकीत घेतले. किंबहुना त्यांना तेवढे कष्ट घ्यावे लागले. बारामतीतल्या दुष्काळी गावांना पायाला भिंगरी लावून भेटी द्याव्या लागल्या. दुष्काळी गावातल्या शाळांच्या समोर जाऊन लहान मुलांसमोर भाषणे करावी लागली. बारामतीचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आपल्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून फक्त 10 जागा घेऊन लढवाव्या लागल्या. या 10 जागांवर देखील सुप्रिया सुळे फारशा प्रचारात दिसल्याच नाहीत, त्या फक्त बारामती प्रचारात दिसल्या. कारण त्यांना बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे दमलेल्या शरद पवारांनाच आपल्या लेकीसाठी बारामतीसह इतर मतदारसंघांमध्ये प्रचाराची धावपळ करावी लागली. कधी नव्हे, ते प्रतिभाताई पवार देखील बारामतीच्या प्रचार सभांमध्ये दिसल्या.

    एकीकडे शरद पवारांसारख्या दमलेल्या बापाची ही कहाणी, तर दुसरीकडे रायबरेलीत दमलेल्या आईची कहाणी सुरू झाली. वायनाड लोकसभा मतदारसंघातले मतदान संपल्यानंतर राहुल गांधींनी फार मोठी “रणनीती” आखत अमेठी ऐवजी रायबरेली इथून उमेदवारी अर्ज भरला. पण आता रायबरेलीची सगळी सूत्रे सोनिया गांधींनीच हातात घेतली. किंबहुना ती त्यांना घ्यावी लागली. सोनिया गांधी आजारी असतात त्या आता फारशा सार्वजनिक ठिकाणी येऊन भाषणे करत नाहीत. त्यांनी काँग्रेसची राजकीय सूत्रे प्रियांका आणि राहुल यांच्या हातात दिली, पण आता भाजपच्या झंझावातात रायबरेली सारख्या गांधी परिवाराच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचे तारू भरकटण्याची चिन्हे दिसायला लागल्याबरोबर सोनिया गांधींनी हस्तक्षेप करून रायबरेलीच्या निवडणुकीची सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. किंबहुना त्यांना ती ताब्यात घ्यावी लागली. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या कालच्या रायबरेली दौऱ्यापूर्वी सोनिया गांधींनी स्वतः कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आज रायबरेलीतल्या रॅलीला सोनिया गांधी संबोधित करणार आहेत.

    एकूण काय तर इंडी आघाडीतले आणि महाविकास आघाडीतले आई – बाप दमले असले, तरी त्यांच्यामागचे मुला – मुलींच्या राजकीय भवितव्याचे राजकीय शुक्लकाष्ट अजिबात सुटले नाही. आपापल्या मुलांचे तारू लोकसभा निवडणुकीत किनाऱ्याला लागावेत यासाठी दमलेले आई – बापचं निवडणुकीची सूत्रे हातात घेऊन फिरताना दिसले आणि दिसत आहेत. हेच उदाहरण कमी अधिक फरकाने बिहार मधल्या लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी या आई – बापांना लागू होते.

    Old mother and fathers are struggling for their son’s and daughter’s political future

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!