Odisha Govt Aashirwad yojana : कोरोना महामारीमुळे देशातील अनेक बालके अनाथ झाली आहेत. या मुलांच्या संगोपनासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा मुलांकडे लक्ष द्यावे, त्यांची काळजी घ्यावी आणि संरक्षणाची व्यवस्था करावी, असे केंद्राकडून राज्यांना सांगण्यात आले होते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी घोषणा केली आहे की, केंद्र सरकार आपली जबाबदारी पंतप्रधान केअर्स फंडातून घेईल. याअंतर्गत मोफत शिक्षण, आरोग्य विमा, मासिक भत्ता आणि दहा लाखांपर्यंतची एक-वेळची मदत जाहीर करण्यात आली आहे. Odisha Govt Aashirwad yojana for children orphaned due to corona, 2500 rupees per month free Education mediclame and House
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशातील अनेक बालके अनाथ झाली आहेत. या मुलांच्या संगोपनासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा मुलांकडे लक्ष द्यावे, त्यांची काळजी घ्यावी आणि संरक्षणाची व्यवस्था करावी, असे केंद्राकडून राज्यांना सांगण्यात आले होते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी घोषणा केली आहे की, केंद्र सरकार आपली जबाबदारी पंतप्रधान केअर्स फंडातून घेईल. याअंतर्गत मोफत शिक्षण, आरोग्य विमा, मासिक भत्ता आणि दहा लाखांपर्यंतची एक-वेळची मदत जाहीर करण्यात आली आहे.
येथे राज्य सरकारही त्यांच्या पातळीवर योजना आणत आहेत. बिहार, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांनंतर आता ओडिशा सरकारनेही या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. अशा सर्व मुलांना आर्थिक मदत देण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रविवारी एक योजना सुरू केली. ज्यांनी कोणत्याही कारणास्तव एक किंवा त्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत, अशा बालकांसाठी ही योजना आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आलेल्या ‘आशीर्वाद’ योजनेतील लाभार्थींना तीन विभागांमध्ये विभागण्यात आले आहे.
1. अनाथ झालेली मुले.
2. ज्या बालकांना बालगृहात जावे लागले.
3. अशी बालके ज्यांनी आपल्या आई-वडिलांपैकी कमावणारा सदस्य गमावला.
दरमहा 2500 रुपये भत्ता
या योजनेंतर्गत आपल्या आईवडिलांना किंवा दोघांपैकी एकाला गमावलेल्या प्रत्येक मुलास सरकार दरमहा 2,500 रुपये देईल. हे पैसे पालकांच्या किंवा खातेदारांच्या बँक खात्यात ते 18 वर्षांचे होईपर्यंत पाठविले जातील. जर एखाद्या बालकाला काळजी घेणारं कुणी नसल्याने बालगृहात जावे लागले तर त्यांना दरमहा एक हजार रुपये अतिरिक्त दिले जाईल.
तसेच जर आई-वडिलांपैकी कमावत्या सदस्याचा मृत्यू झाला असेल, तर मुलांना 1,500 रुपये दिले जातील. जर त्यांच्या माता ओडिशा सरकारच्या मधु बाबू पेन्शन योजनेस पात्र असतील तर त्यांना प्राथमिकतेच्या आधारावर भत्ता देण्यात येईल.
मोफत शिक्षण, औषध आणि अन्न
अशी सर्व मुले केंद्र व राज्य सरकारच्या अन्न योजना व बीजद सरकारच्या बिजू आरोग्य कल्याण योजनेंतर्गत मोफत वैद्यकीय सेवा घेण्यास सक्षम असतील. राज्य सरकार शाळांमध्ये त्यांच्या शिक्षणाचीही व्यवस्था करेल. गरज भासल्यास अशा मुलांच्या प्रवेशासाठी आदर्श विद्यालय आणि केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची व्यवस्था केली जाईल. त्यांना राज्याच्या ‘ग्रीन पॅसेज’ योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी मदत मिळणार आहे.
मुलांच्या काळजी घेणाऱ्यांना पक्के घर
अशा मुलांचे पालक आणि देखभाल करणार्यांना विविध योजनांतर्गत पक्के घरे देण्याचेही राज्य सरकारने ठरविले आहे. तथापि, कुणीतरी दत्तक घेतलेल्या मुलांना ‘आशीर्वाद’ योजना लागू होणार नाही.
या योजनेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण गट, चाइल्डलाइन, मंडळ व पंचायत स्तरीय समित्या व फ्रंटलाइन कामगारांना कोणताही लाभार्थी सुटू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
विशेष मोहिमेद्वारे मुलांची ओळख
ते म्हणाले की, त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा मुलांना ओळखण्यासाठी जिल्हाधिकारी दरवर्षी एक विशेष मोहीम राबवितात. मुलांच्या पालकांनी आणि काळजीवाहकांना ‘आशीर्वाद’ योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी बाल संरक्षण दलात बाल संरक्षण युनिटकडे जाण्यास सांगितले गेले आहे. मुलांचे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरेल.
Odisha Govt Aashirwad yojana for children orphaned due to corona, 2500 rupees per month free Education mediclame and House
महत्त्वाच्या बातम्या
- आठवलेंचा शिवसेनेला सल्ला, भवितव्याचा विचार करून भाजपशी युती करा; सत्तेचा दिला फॉर्म्युला
- आघाडीत बिघाडी : नाना पटोले म्हणाले – महाविकास आघाडी कायमस्वरूपी नाही, फक्त ५ वर्षांसाठी !
- पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांवर राहुल गांधींची टीका, म्हणाले – ‘मोदी सरकारने टॅक्स वसुलीत पीएचडी केली!
- कोरोना प्रतिबंधक लसी आणि औषधे पेटंटमुक्तीसाठी विश्व जागृती दिन संपन्न; १६ लाख लोकांचे समर्थन
- पंजाब काँग्रेसमध्ये घमासान, आमदार पुत्रांना सरकारी नोकरीप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध अनेक नेत्यांनी ठोकले शड्डू