विशेष प्रतिनिधी
ब्रेकफास्टला काय करावे, हा गृहिणींना रोजचा भेडसावणारा प्रश्न आहे. ब्रेकफास्ट पोटभर आणि तो पौष्टिकही असायलाच हवा. म्हणूनच शेवग्याच्या पानांचा पराठा ही झक्कास रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. Nutritious paratha of sugarcane leaves
पराठा करण्याची रेसिपी
- एक मोठी वाटी भरून शेवग्याची कोवळी पाने घ्या
- शेवग्याची कोवळी पाने अगदी बारीक चिरून घ्या
- चार कप तांदळाचे पीठ घेऊन त्यात ही पाने टाका
- तांदळाचे पीठा ऐवजी कणीक,ज्वारी पीठही चालते
- पीठात चिरलेला कांदा, टाेमॅटो, कोथिंबीरही टाका
- अद्रक, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट वापरा
- वरील साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्या
- पराठे लाटून तव्यावर भाजून घ्यावेत.
- पराठे चविष्ट होण्यासाठी तव्यावर तूप सोडावे