• Download App
    नुसरत नवर्यापासून विभक्त : तृणमूल खासदारचे भाजपच्या यश दासगुप्ता सोबत अफेअर ;  घटस्फोटाची आवश्यकताच नाही ; कारण लग्नच बेकायदेशीर ; पतीवर गंभीर आरोप Nusrat's Separated from husband : Trinamool MP's affair with BJP's Yash Dasgupta; There is no need for divorce; Because marriage is illegal; Serious allegations against the husband

    नुसरत नवऱ्यापासून विभक्त : तृणमूलच्या नुसरत जहाँचे भाजपच्या यश दासगुप्तांसोबत अफेअर ; घटस्फोटाची आवश्यकताच नाही ; कारण लग्नच बेकायदेशीर

    • पश्चिम बंगाल आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. बांग्ला अभिनेत्री आणि तृणमूल खासदार नुसरत जहां यांचं लग्न वर्षभराच्या आतच मोडलं आहे. विशेष म्हणजे त्याची घोषणा खुद्द नुसरत जहां यांनी केली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बांग्ला अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचं लग्न अवघ्या दोन वर्षभराच्या आतच मोडलं आहे. विशेष म्हणजे त्याची घोषणा खुद्द नुसरत जहां यांनी केली आहे. एक वक्तव्य जारी करत लग्न अवैध आणि बेकायदेशीर असल्याची घोषणाच नुसरत जहां यांनी केली . नुसरत जहांने  पती निखिल जैनवर आर्थिक घोटाळ्याचे आरोपही केले आहेत. Nusrat’s Separated from husband : Trinamool MP’s affair with BJP’s Yash Dasgupta; There is no need for divorce; Because marriage is illegal; Serious allegations against the husband

    आश्चर्य म्हणजे नुसरत जहां आणि निखिल जैन यांचं लग्न  19 जून 2019ला तुर्कितल्या बोद्रममध्ये झालं होतं.2 वर्ष पूर्ण होण्याआधीच ते नातं संपल्याची घोषणा नुसरत जहांने केली आहे. नुसरत जहां आणि निखिल जैन यांचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोजही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आज नुसरत जहां यांनी एक स्टेटमेंट जारी केलं आहे.

    नुसरत जहां यांचे मोठे दावे 

    तुर्की मॅरेज रजिस्ट्रेशन कायद्यानुसार हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हे दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचं लग्न होतं. त्यामुळे ते स्पेशल मॅरेज एक्टनुसार नोंद होणं गरजेचं होतं. पण ते कधीच झालं नाही. तुर्कीच्या कायद्यानुसार हे लग्न नसून ते एक रिलेशिनशिप होती. फार फार तर त्याला लिव्ह इन रिलेशनशिप  म्हणता येईल. त्यामुळे तलाक  घेण्याचा प्रश्नच नाही.

    दोघेही आधीच वेगळं झाल्याचं नुसरत निवेदनात म्हणतात. मी कधीच याबाबत सार्वजनिक स्वरुपात बोललेली नाही. कारण माझं वैयक्तिक जीवन हे स्वत: पुरतच मर्यादीत ठेवू इच्छिते. माझ्या कुठल्याच निर्णयाला ‘अलगाव’ला जोडून बघितलं जाऊ नये. माझं लग्न कधीच कायदेशीर नव्हतं आणि कायद्याच्या नजरेत त्याला लग्न म्हणताही येत नाही .

    माझ्या लग्नाबद्दल चर्चा होऊ नये असही नुसरत जहां यांचं म्हणणं आहे. कारण ते त्यांचं वैयक्तिक जीवन आहे. कथित लग्नच बेकायदेशीर होतं. त्यामुळे त्याला इतर गोष्टींशी जोडून बघू नये अशी अपेक्षाही नुसरत जहाँ व्यक्त करतायत.

    पती निखिल जैन यांचं नाव न घेता नुसरत जहां म्हणतात, तो व्यक्ती स्वत:च्या श्रीमंत होण्याचे दावे करतो आहे. तसंच त्याचा वापर केल्याचाही तो आरोप करतो आहे. पण वास्तव उलटं आहे. कारण खुप काळापासून माझ्याच अकाऊंटमधून बेयकादेशीरपणे तो पैसे काढतो आहे. माझ्यापासून वेगळं झाल्यानंतरही त्या व्यक्तीनं (निखिलनं) रात्री-मध्यरात्री माझ्या अकाऊंटमधून पैसे काढले आहेत. मी याबाबत पोलीसात तक्रार केलेली आहे.

    माझ्या अनेक वस्तू, ज्यात माझ्या बॅग्ज, कपडे आणि इतर गोष्टींचा समावेश आहे, त्या अजूनही या व्यक्तीकडेच आहेत. मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की, माझे सगळे दागिने जे माझं कुटुंब, मित्र, नातेवाईकांनी दिले होते ते अजूनही याच व्यक्तीच्या ताब्यात आहेत.

    तुम्ही ‘श्रीमंत’ आहात म्हणजे स्वत:ला पीडित म्हणून सांगू शकत नाही आणि एखाद्या महिलेवर खोटे आरोप करण्याचाही तुम्हाला अधिकार मिळत नाही. मी माझी ओळख मोठ्या मेहनतीतून निर्माण केली आहे आणि माझ्यामार्फत मी कुणाला फेमस होऊ देणार नाही.

    माझ्या वैयक्तिक नातेसंबंधाची चर्चा मी कधीच कुणाशी केलेली नाही. लोकांनीही अशी चर्चा करु नये. मी मीडियालाही आवाहन करते की, ज्या व्यक्तीपासून मी खुप काळापुर्वीच वेगळी झाली आहे, त्याला ‘हिरो’ म्हणून सादर करु नये.

    दरम्यान, अभिनेता आणि राजकारणी यश दासगुप्ता  यांच्याशी नुसरतच्या अफेअरची चर्चा आहे . नुसरत जहां अभिनयातून राजकारणात आलेल्या यश दासगुप्ताला डेट करत आहेत. यशने 2021 मध्ये भाजपच्या तिकिटावर बंगालमध्ये निवडणूक लढविली होती. दरम्यान, नुसरत गर्भवती असल्याचीही चर्चा आहे. त्याचबरोबर लेखिका तस्लीमा नसरीन यांनीही सोशल मीडियावर या वृत्तांवर भाष्य केले. तस्लीमा म्हणाली आहे की जर नुसरत यशबरोबर असेल तर तिने निखिलपासून घटस्फोट घ्यावा।

    Nusrat’s Separated from husband : Trinamool MP’s affair with BJP’s Yash Dasgupta; There is no need for divorce; Because marriage is illegal; Serious allegations against the husband

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य