• Download App
    Nusrat jahan Controversy !संसदेत तृणमूल खासदारने स्वत:च घेतली नुसरत जहां रुही जैन नावाने शपथ ; आता म्हणे लग्नच बेकायदेशीर ; संसदेत खोट्या नावासह शपथ घेताना व्हिडीओ व्हायरल Nusrat jahan Controversy! Trinamool MP himself took oath in Parliament as Nusrat Jahan Ruhi Jain; Now say marriage is illegal; Video goes viral while taking oath in Parliament under a false name

    Nusrat jahan Controversy !संसदेत तृणमूल खासदारने स्वत:च घेतली नुसरत जहां रुही जैन नावाने शपथ ; आता म्हणे लग्नच बेकायदेशीर ; संसदेत खोट्या नावासह शपथ घेताना व्हिडीओ व्हायरल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ आजकाल वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुसरत जहांने 2019 मध्ये निखिल जैनशी लग्न केले. लग्नानंतर नुसरत जेव्हा सिंदूर लाऊन संसदेत पोहोचल्या तेव्हा लोक चकीत झाले. नुसरत यांनी संसदेत शपथ घेताना देखील निखील जैन यांचे नाव लावत ‘नुसरत जहां रुही जैन’ अशी शपथ घेतली . यानंतर नुसरत जहां यांच्याविरूद्ध फतवाही काढण्यात आला. पण आता नुसरत जहांने खुलासा केला आहे की त्या पती निखिलसोबत राहत नाहीत आणि त्यांचे लग्न भारतात मान्य नाही.त्यांचे लग्न बेकायदेशीर आहे . Nusrat jahan Controversy! Trinamool MP himself took oath in Parliament as Nusrat Jahan Ruhi Jain; Now say marriage is illegal; Video goes viral while taking oath in Parliament under a false name

    इतकेच नाही तर नुसरतने इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून लग्नाची सर्व छायाचित्रेही हटविली आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्याचवेळी आता लोकांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.

    नुसरत जहां रुही जैन यांचे वैयक्तिक जीवन, त्यांचे लग्न कोणाशी झाले आहे किंवा त्या कोणाबरोबर राहतात, हे कोणाचाही चिंतेचे विषय असू नये. परंतु त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी निखिल जैन यांच्याशी लग्न केल्याचे संसदेत नोंदवले गेले आहे. मग त्या सभागृहात शपथ घेताना खोटं बोलल्या का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .

    काय आहे प्रकरण ?

    बांग्ला अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचं लग्न अवघ्या दोन वर्षभराच्या आतच मोडलं आहे. विशेष म्हणजे त्याची घोषणा खुद्द नुसरत जहां यांनी केली आहे. एक वक्तव्य जारी करत लग्न अवैध आणि बेकायदेशीर असल्याची घोषणाच नुसरत जहां यांनी केली . नुसरत जहांने पती निखिल जैनवर आर्थिक घोटाळ्याचे आरोपही केले आहेत.

    आश्चर्य म्हणजे नुसरत जहां आणि निखिल जैन यांचं लग्न 19 जून 2019ला तुर्कितल्या बोद्रममध्ये झालं होतं.2 वर्ष पूर्ण होण्याआधीच ते नातं संपल्याची घोषणा नुसरत जहांने केली आहे. नुसरत जहां आणि निखिल जैन यांचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोजही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आज नुसरत जहां यांनी एक स्टेटमेंट जारी केलं आहे.

    Nusrat jahan Controversy! Trinamool MP himself took oath in Parliament as Nusrat Jahan Ruhi Jain; Now say marriage is illegal; Video goes viral while taking oath in Parliament under a false name

    Related posts

    India-Pak : भारत-पाक तणावादरम्यान परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी; मे महिन्यात आतापर्यंत ₹14,167 कोटींची गुंतवणूक

    Pakistan earthquake : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात आधीच रेडिएशनची भीती, त्यात दोन दिवसांनंतर आज तिसऱ्या भूकंपाचा धक्का!!

    Rajnath Singh : राजनाथ म्हणाले- रावळपिंडीपर्यंत ब्राह्मोसचा आवाज गेला; ते आपल्या सैन्याच्या ताकदीचे प्रतीक