• Download App
    Nusrat Jahan Controversy: Shocking revelation of husband Nikhil Jain after Nusrat's statement; Persistent refusal to register marriage Nusrat Jahan Controversy : नुसरतच्या वक्तव्यानंतर पती निखील जैनचा धक्कादायक खुलासा ; लग्न रजिस्टर करण्यास सतत नकार

    Nusrat Jahan Controversy : नुसरतच्या वक्तव्यानंतर पती निखील जैनचा धक्कादायक खुलासा ; लग्न रजिस्टर करण्यास सतत नकार

    Nusrat Jahan Controversy: Shocking revelation of husband Nikhil Jain after Nusrat’s statement; Persistent refusal to register marriage


     विशेष प्रतिनिधी

    मुंबई : तृणमूलच्या खासदार नुसरत जहां आणि निखिल जैन यांच्यातील वाद काही थांबण्याच नाव घेत नाही. दोघंही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. नुसरत जहांच्या धक्कादायक वक्तव्यावर पती निखिल जैनने पहिल्यांदा मोठा खुलासा केला आहे. यावेळी जवळपास नऊ मुद्यांमध्ये निखिल जैनने आपलं मत मांडलं आहे. लग्न रजिस्टर करण्यास मी अनेकदा तगादा लावलं मात्र नुसरत कायमच ही गोष्ट नाकारत राहिली असेही निखील जैन यांनी स्पष्ट केले आहे .

    निखिलने नुसरत आणि यश दासगुप्ता यांच्यात अफेअर असल्याचा इशारा दिला आहे. मात्र त्याने स्पष्टपणे यशचं नाव घेतलं नाही. मात्र काहीही न बोलता निखिलने याच कारणामुळे आपल्या विवाहित जीवनात वाद निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

    निखिल जैनने दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या ऑगस्ट महिन्यात एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यानच नुसरतच्या स्वभावात बदल झाला. याचं कारण मात्र फक्त नुसरतला माहित आहे. माझ्या पत्नीच्या स्वभावात एवढा बदल झाला की, मला विश्वासच बसला नाही. हा सिनेमा यश दासगुप्तासोबत रिलिज होणार होता. दोघं मिमी चक्रवर्तीसोबत लीड रोलमध्ये दिसले. ‘एसओएस कोलकाता’ असं त्या सिनेमाचं नाव होतं. नुसरत आणि यश दोघंही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होते. दोघांचे एकत्र अनेक फोटो देखील होते.

    नुसरत आणि यश दासगुप्ता यांनी सिजलिंग फोटोशूट केलंय. ज्यामध्ये दोघांमधील जवळीक आणखी वाढली. नुसरतने यशसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. याचदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनी खूप पसंत केली.

    निखिल जैनने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. लग्न रजिस्टर करण्यास मी अनेकदा तगादा लावलं मात्र नुसरत कायमच ही गोष्ट नाकारत राहिली. 5 नोव्हेंबर 2020 रोजी नुसरत आपली बॅग आणि काही सामान घेऊन आपल्या फ्लॅटवर शिफ्ट झाली. यानंतर आम्ही वेगळे झालो. ती आपल्यासोबत सर्व खासगी गोष्टी, महत्वाचे कागदपत्रे घेऊन गेले.

    Nusrat Jahan Controversy: Shocking revelation of husband Nikhil Jain after Nusrat’s statement; Persistent refusal to register marriage

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य