- तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहां गर्भवती असल्याची बातमी चर्चेत आली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ गर्भवती असल्याची बातमी चर्चेत आली आहे. पण, यावेळी त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी नुसरतच्या गरोदरपणाच्या बातमीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वास्तविक, गेल्या काही महिन्यांपासून नुसरत आणि तिचा नवरा निखिल जैन यांच्यातील नाते बिनसल्याची चर्चा होती. अभिनेता यश दासगुप्तसोबत नुसरतचे अफेयर असल्याची बातमीही चर्चेत होती. आता लेखिका तस्लीमा नसरीन यांनी नुसरतच्या गरोदरपणाबद्दल आपले मत मांडले आहे.Nusrat Jahan controversy | Nusrat pregnant; Husband Nikhil Jain doesn’t even know! Author Taslima Nasreen’s post goes viral
तस्लीमा नसरीन यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी नुसरतला पती निखिलपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आहे. तस्लीमा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘नुसरतच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. ती गर्भवती आहे. याविषयी तिचा पती निखिलला काही माहिती नाही. दोघे सहा महिन्यांपासून विभक्त झाले आहेत. पण, अभिनेत्री नुसरत यश नावाच्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे.’
तस्लीमा नसरीन यांनी नुसरतला पती निखिलपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2389362531208191&id=100004034030498
काय म्हणाल्या तस्लीमा नसरीन?
‘लोकांना असे वाटत आहे की, या बाळाचे वडील यश आहे, निखिल नाहीत. बातमी असो वा अफवा, ही परिस्थिती कायम राहिली तर, मला वाटते निखिल आणि नुसरतचे घटस्फोट घेणे चांगले नाही का? वटवाघळाप्रमाणे लटकत्या नातेसंबंधात अडकून राहण्यात अर्थ नाही. यामुळे दोन्ही पक्षांची गैरसोय होईल.’
तस्लीमा पुढे लिहितात- ‘जेव्हा नुसरत आणि निखिलचे लग्न झाले तेव्हा ते खूप छान वाटले होते, त्याचप्रमाणे श्रीजित आणि मिथिलाचे लग्न झाल्यावर देखील मला खूप आनंद झाला होता. जर दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचा विवाह असेल, तर मी अगदी आनंदी होते.’
‘जाती धर्म वगैरे हटवायचे असेल तर वेगवेगळ्या जाती आणि वेगवेगळ्या धर्मातील लोकांना नात्यात बांधावं लागेल. हिंसाचार यापासून दूर जाऊ शकतो. पण कोणाला माहित होते की, हे प्रेमळ जोडपे एकमेकांसोबत जास्त काळ आनंद राहणार नाही!
शेवटी पुरुष ते पुरुष…
‘त्या दिवशी ब्रत्याच्या फोटोत मी नुसरतला पाहिले होते, मी नुसरतचा फोटो पहिल्यांदाच पाहिला होता. ती मुलगी अँजेलीना जोलीसारखी दिसत आहे, ती अभिनय देखील खूप चांगला करते. नक्कीच ती स्वतंत्र आहे. खरं तर, जर तुम्ही आत्मनिर्भर आणि जागरूक असाल, तर तुमच्यात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाचे पालकही होऊ शकता.’
‘आपण आपल्या स्वतःच्या ओळखीनेच आपल्या मुलाचे संगोपन करू शकता. यासाठी पुरुष आजूबाजूला असण्याची गरज नाही. खरं तर निखिल आणि यश यात काय फरक आहे! शेवटी, पुरुष ते पुरुष… एका व्यक्तीला सोडून दुसर्याशी लग्न केल्याने आयुष्य खूप आनंदी होते. दुसरे विषारी जीवन जगण्यासाठी आपल्याला पुन्हा लग्न करावे लागेल का? मग ही शर्यत संपणार नाही, इच्छित व्यक्तीशी देखील आपले जुळत नाही. स्वतंत्र स्त्रीच्या स्वप्नातील माणूस वास्तवात नव्हे तर कल्पनेतच असतो.’