सध्या संगणकावर लिहिताना स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक झाली तर इंटरनेटच्या मदतीने किंवा गुगुल स्पेलचेकच्या मदतीने ती सहज दुरुस्त करता येते. केवळ संगणकच नव्हे तर मोबाईलवरदेखील बिनचूक लिहिता येते. पण ज्यावेळी आपण कागदावर पेनने लिहीत असतो त्यावेळी आपल्या चुका दाखविण्यास कोणी नसते. लेखनाचा कितीही सराव असला तरी बिनचुक लिहीता येणे ही खचितच अवघड बाब आहे यात शंका नाही. लिहताना अनेकदा व्याकरणाच्या चुकाही होत असतात. अक्षर सुधारता येत असते.Now your smart pen will show your writing and grammar mistakes
पण व्याकरण किंवा स्पेलिंगचे तसे नाही. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी व्याकरणाचा चांगला अभ्यास असावा लागतो आणि स्पेलिंगसाठी चांगले पाठांतरदेखील असावे लागते. पण यातील सर्वच गोष्टी जुळून येत नाहीत. व्याकरणातील व स्पेलिंगमधील या चुका सुधारायच्या कशा असा प्रश्न कदाचित यापुढे पडणार नाही. कारण आता अशा चुका होणारच नाही आणि समजा झाल्या तर लिहताक्षणी तुम्हाला त्याची जाणीव करुन देणारे एक स्मार्टपेन विकसित करण्यात आले आहे.
जर्मनीतल्या एका कंपनीने हे पेन विकसित केले आहे. या पेनने लिहिताना स्पेलिंग चुकत असतील किंवा त्यांच्या काही व्याकरणविषयक चुका होत असतील तर तुम्हाला लगेच सूचना मिळणार आहे. मुलांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून हे पेन बनविले आहे. जर्मनच्या लर्नशिफ्ट या कंपनीने हे स्मार्टपेन विकसित केले आहे. या स्मार्टपेनला दोन मोड आहेत. यातील आर्थोग्राफी मोड स्पेलिंग किंवा व्याकरणविषयक चुका होण्यापासून रोखणार आहे
तर कॅलिग्राफी मोड सुवाच्य व सुंदर अक्षर काढण्यास मदत करणार आहे. लिहिणारी व्यक्ती जेव्हा कधी चूक करेल तेव्हा यातील विशेष सेन्सर प्रणाली त्याच्या हाताला व्हायब्रेशनचा हलकासा झटका देईल. त्यामुळे यापुढे सुंदर व अचूक लेखनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामिळे लिहताना आता यापुढे खराब अक्षऱ येणारच नाही याची खात्री देथा येणार आहे.