विशेष प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्हा बॅक निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. आता खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी व विरोधकांना सवाल केला आहे. मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का ? पण माझा विषय आला की सगळे ढवळा ढवळ करतात. आता मी ढवळा ढवळ करु का ? असा सवाल करत त्यांनी विरोधकांना फटकारले आहे.
मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय की , मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही, असा टोला त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना लगावला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज कराड मधील राजकीय नेत्यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड उदयसिंह उंडाळकर यांच्याशी कमराबंद बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
- आता तुम्हीच सांगा मी ढवळा ढवळ करु का ?
- सातारा जिल्हा बँकेचे राजकारण तापू लागले
- अजून गाठी भेटी संपायच्या आहेत
- सर्व मतदार आहेत, कुठे जायचे ते मी ठरवतो
- सर्व समावेशक पॅनेलबाबतअजून निर्णय नाही
- मी लोकांच्या सोबत आहे.
- मी माझ्या बंधूसोबतच आहे, त्यांना लक्षात येत नाही
- मतदारांनी सांगितले तर फॉर्म विड्रॉ करेन
- कोणाच्या सांगण्याने फॉर्म विड्रॉ करणार नाही.