विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : आता ठरले जनतेचे हिताला प्राधान्य द्यायचे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीत आणले पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली पाहिजेत. त्यामुळे जनतेला इंधन ५० टक्के कमी दरात मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.Now it is in the public interest Preference: Mungantiwar
लखनौ येथे जीएसटी कौन्सिलची परिषद बोलावली आहे. त्या परिषदेमध्ये पेट्रोल आणि डिझेल, गॅस आणि इंधनविषयक वस्तू या जीएसटीत आणण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार बोलत होते.
जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवाकर असून एक देश आणि एक कर या प्रमाणे तो देशात लागू केला होता. परंतु त्यातून पेट्रोल, डिझेल, गॅस आणि अन्य इंधने वगळली होती. आता परिषदेत पन्हा त्यांचा समावेश जीएसटीत करण्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे इंधनाचे दर ५० टक्क्यांनी कमी होणार आहेत.
- आता ठरले जनहिताला प्राधान्य : मुनगंटीवार
- पेट्रोल, डिझेल जीएसटीत आणण्याचा निर्णय होणार
- महाराष्ट्रानेही जीएसटी बाबतचा निर्णय लागू करावा
- इंधनाचे दर ५० टक्क्यांनी कमी करता येणार आहेत
- महागाईने पिचलेल्या जनतेला दिलासा द्यावा
- देश आणि एक कर प्रणालीत इंधनही समाविष्ट
- आमचे वेगळे आणि तुमचे वेगळे चालणार नाही
- जनतेच्या हितासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावले टाकावीत
Now it is in the public interest Preference: Mungantiwar