नाशिक – जम्मू – काश्मीरसंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर एक तितकीच महत्त्वाची राजकीय बाब स्पष्ट होत आहे, ती म्हणजे आता ३७० कलमाच्या पुनःस्थापनेसाठी काश्मीरमधल्या फक्त दोन राजकीय घराण्यांचाच आवाज शिल्लक उरला आहे. राज्यातील बाकीच्या राजकीय पक्षांनी लोकशाही प्रक्रियेला प्राधान्य देऊन निवडणूका लवकर घेण्याच्या मागणीवर लक्ष केंद्रीत करायचे ठरवलेले दिसत आहे. Not only Mehbooba Mufti but Farooq sa’ab also said that it took 70 years for BJP to succeed
काँग्रेसने तर पंतप्रधानांसमोर ठेवलेल्या ५ मागण्यांमध्ये ३७० कलमाच्या पुनःस्थापनेचा विषयच नव्हता. याचा अर्थ काँग्रेसने मेहबूबा मुफ्ती आणि फारूख अब्दुल्ला यांच्या पासून स्वतःला अलग करून त्यांच्यापासूनचे राजकीय अंतर वाढविले आहे. गुलाम नबी आझादांनी ही बाब दोन्ही पक्षांचे नाव न घेता सूचित केली होती.
आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद यांनी हीच बाब स्पष्ट करून सांगितली आहे. ते म्हणाले, गेली कित्येक वर्षे दिल्ली दक्षिणेकडे पाहायची तर आम्ही म्हणजे काश्मीरी पक्ष उत्तरेकडे पाहायचो. म्हणजे दिल्लीतल्या नेत्यांची तोंडे आणि काश्मीरी नेत्यांची तोंडे एकमेकांच्या विरूध्द दिशांना असायची. पण पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीत बर्फ वितलळा आहे. सगळ्या नेत्यांची मते वेगवेगळी असली, तरी तोंडे एकाच दिशेला झाली आहेत. ही समाधानाची बाब आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी मात्र, आपला वेगळा सूर कायम ठेवला आहे. त्यांनी आजच्या पत्रकार परिषदांमध्ये ३७० चा राग पुन्हा आळवला आहे.
भाजपला त्यांच्या अजेंड्यानुसार ३७० कलम हटवायला ७० वर्षे लागली. आम्हाला ते पुनःस्थापित करायला ७० आठवडे, ७० महिने किंवा त्यापेक्षाही जास्त काळ लागला तरी चालेल. आम्ही आमच्या मार्गापासून ढळणार नाही, अशी गर्जना ओमर अब्दुल्ला यांनी केली. त्याला डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी दुजोरा दिला.
३७० कलम पुन्हा लागू केल्याशिवाय आणि जम्मू – काश्मीरला राज्याचा दर्जा दिल्याशिवाय पीडीपी निवडणूका लढवणार नसल्याची घोषणा मेहबूबा मुफ्ती यांनी केली. ही भूमिका त्यांनी पंतप्रधानांच्या बैठकीनंतर बाहेर येऊन पत्रकार परिषदेत मांडली होती. तिचा आज त्यांनी पुनरूच्चार केला.
अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबूबांची पीडीपी वगळून जम्मू काश्मीरमधले अन्य ६ पक्ष पंतप्रधानांच्या बैठकीत सहभागी झाले होते. पण या पक्षांचा सूर आता अब्दुल्ला आणि मुफ्ती यांच्यापेक्षा वेगळा बोलायला लागला आहे. हा राजकीय फरक हळूहळू स्पष्ट होताना दिसू लागला आहे. (गुपकार गट अजूनही अस्तित्वात आहे.)