• Download App
    आज जम्मू काश्मीरात 'डीडीसी'चे निकाल; हे निकाल का आहेत ऐतिहासिक? | The Focus India

    आज जम्मू काश्मीरात ‘डीडीसी’चे निकाल; हे निकाल का आहेत ऐतिहासिक?

    वादग्रस्त ३७० वे कलम रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश बनलेल्या जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच ७३वी घटनादुरूस्ती लागू झाल्याने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तेथे आकाराला येत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : ऐतिहासिक जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुकांचे आज निकाल आहेत. त्यांचे महत्त्व खरोखर ऐतिहासिक आहे. कारण..

    Not ‘bullets’ in Jammu and Kashmir; ‘Ballet’ wins; DDC results today

    • वादग्रस्त ३७० वे कलम रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश बनलेल्या जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच ७३वी घटनादुरूस्ती लागू झाल्याने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तेथे आकाराला येत आहे. म्हणजे ७२ वर्षांमध्ये त्यासाठी आता प्रथमच मतदान झाले आहे. आतापर्यंत सरकारनियुक्त जिला विकास परिषदा होत्या; आता तेथे जनतानियुक्त जिल्हा विकास परिषदा प्रथमच अस्तित्वात येत आहेत.
    •  ७२ वर्षांत प्रथमच वाल्मिकी समाज, गोरखा समाज आणि पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना मतदानाचा अधिकार मिळाला. मूळच्या जम्मू काश्मीरमध्ये जन्मलेल्या, पण विवाह जम्मू काश्मीरबाहेर केलेल्या लेकींचाही हक्क माहेर डावलत होते. या चार समाजघटकांना मतदानासारखा अत्यंत मूलभूत हक्क आतापर्यंत नाकारला गेला आणि तो ही तथाकथित लोकशाहीवाद्यांकडून. या लाखो लोकांनी प्रथमच मतदानाचा पवित्र हक्क बजावला.
    • याशिवाय १५ वर्षांपासून रहिवाशी असलेले कोणीही व्यक्ती प्रथमच मतदान करेल. कारण ३७० कलम रद्द झाल्यानंतर अनेक दशके जम्मू काश्मीरमध्ये राहणारया या समाजघटकांना रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल) मिळाले आहे. आणि, ते भारताबरोबरच ‘जम्मू काश्मीरचेही नागरिक’ बनले आहेत.

    • ‘डीडीसी’च्या २४० जागा, ग्रामपंचायतींच्या सुमारे तेरा हजार जागा आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २४० पोटनिवडणुका झाल्या आहेत.

    Not ‘bullets’ in Jammu and Kashmir; ‘Ballet’ wins; DDC results today

    • आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अब्दुल्ला आणि नुसती कुटुंबीयांनी एकत्र येऊन चीन पाकिस्तानच्या मदतीने 370 कलम पुन्हा लागू करण्याची दर्पोक्ती केली होती. तिला राज्यातील मतदारांनी भरघोस मतदान करून चोख प्रत्युत्तर दिले आहे त्याचा आज निकाल आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??