• Download App
    राज्यात कोरोना AY 4 व्हेरियंटचा रुग्ण नाही लसीकरण मोहीम वेगाने राबविणार - टोपेNot a singal patient of the Corona AY 4 variant in the state

    राज्यात कोरोना AY 4 व्हेरियंटचा रुग्ण नाही लसीकरण मोहीम वेगाने राबविणार – टोपे

    वृत्तसंस्था

    जालना : महाराष्ट्रात कोरोनाच्या AY 4 व्हेरीयंटचा शिरकाव झाला नाही. तो होऊ नये म्हणून आरोग्य विभागाला योग्य सूचना केल्या जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली.Not a singal patient of the Corona AY 4 variant in the state

    केंद्राच्या टास्क फोर्सने जलदगतीने लसीकरण करण्याच्या सूचना राज्यांना केल्याची माहिती समोर आली आहे. मिशन कवचकुंडल अंतर्गत महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत वेगाने लसीकरण केलं जाणार असल्याचे ते म्हणाले.
    लसीकरण वेगाने होण्यासाठी आणखी काही विभागाची मदत घेतली जात आहे. सध्या दोन डोस मधील अंतर ८४ दिवसांचं आहे या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा केंद्राचा मानस नाही.त्यामुळे हे अंतर आहे तसेच कायम राहील, असेही ते म्हणाले. दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ३ दिवसांत अर्थ विभागाकडे पाठपुरावा करून प्रयत्न केले जात असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले.

    •  राज्यात कोरोना AY 4 व्हेरियंटचा रुग्ण नाही
    •  मिशन कवचकुंडलमध्ये वेगाने लसीकरण
    •  दिवाळीपर्यंत वेगाने लसीकरण मोहीम राबविणार
    •  दोन डोसमधील अंतर तूर्त कमी केले जाणार नाही
    •  दुसरा डोस ८४ दिवसानंतरच दिला जाणार आहे
    •  दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न
    •  अर्थ विभागाकडे पाठपुरावा करणार आहे

    Not a singal patient of the Corona AY 4 variant in the state

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…