• Download App
    Cruel Kim Jong Un : भयावह-सनकी हुकूमशाह किम जोंग उन! जीवघेणी थंडी-हजारो लोक-पाण्यात नाच-उणे15°C तापमान- स्वस्तुतीपर भाषण ; स्वतः साठी हिडन हिटर.North Korea’s Kim Jong-un uses hidden heaters as he keeps thousands standing in freezing cold for speech.

    Cruel Kim Jong Un : भयावह-सनकी हुकूमशाह किम जोंग उन! जीवघेणी थंडी-हजारो लोक-पाण्यात नाच-उणे15°C तापमान- स्वस्तुतीपर भाषण ; स्वतः साठी हिडन हिटर…

    उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा त्यांच्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध आहे. किम जोंग उनचा असाच आणखी एक भयानक कारनामा समोर आला आहे.


    वडिलांच्या जयंतीनिमित्त हजारो लोकांना -15°C तापमानाच्या जीवघेण्या थंडीत उभे केले.तर, कलाकारांना पाण्यात नाचवले. रेड कार्पेटखाली माञ हिटर होते जिथे स्वतः हुकुमशाह किम बसला होता.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा त्याच्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध आहे. किम जोंग उनचा असाच आणखी एक भयानक कारनामा समोर आला आहे. वडिलांच्या जयंतीनिमित्त हजारो लोकांना -15°C तापमानाच्या जीवघेण्या थंडीत उभे केले. तर, कलाकारांना पाण्यात नाचवले.
    North Korea’s Kim Jong-un uses hidden heaters as he keeps thousands standing in freezing cold for speech

    किम इतर अधिकार्‍यांसमवेत बसलेल्या लांब डेस्कवर लांब विद्युत तारा दिसल्या होत्या आणि तापमान खूपच कमी असल्याने त्यांना उबदार ठेवण्यासाठी लपविलेल्या हीटर्सचा वापर करण्यात आला होता.

     

     

    एनके न्यूजच्या प्रतिनिधीने ट्विटरवर सांगितले की, “लांब डेस्कमध्ये हिडण हीटर होते, रेड कार्पेटच्या खाली जाणाऱ्या तारांच्या मोठ्या ढिगाऱ्यावरून हे स्पष्ट झाले होते .

    मात्र, हजारो लोकांना कडाक्याच्या थंडीत हातमोजे आणि टोप्या न घालता अर्धा तास त्यांच्या कुटुंबीयांचे कौतुक करणारे भाषण ऐकवण्यात आले.

    किमच्या वडिलांचे 2011 मध्ये निधन झाले. किम जोंग उनचे वडील किम जोंग इल यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त उत्तर कोरियातील सामजियान शहरात कार्यक्रम पार पडला. हुकूमशहा किम यांचे भाषण ऐकण्यासाठी त्यांच्या पुतळ्यासमोर हजारो लोक उभे होते.

    लोक हातमोजे किंवा टोपी न घालता -15°C तापमानात 30 मिनिटे उभे राहिले आणि किम जोंग उन यांनी आपल्या वडिलांच्या कार्याचा गौरव केला.

    ‘डे ऑफ शाइनिंग स्टार’ कार्यक्रमा दरम्यान फ्लावर शो और अन्य कल्चरल प्रोग्राम आयोजित केले होते. यावेळी कलाकारांना त्याने थंडगार पाण्यात नृत्य प्रदर्शन करालया सांगीतले.

    किम जोंग-इलची जयंती ही उत्तर कोरियातील सर्वात महत्त्वाची सुट्टी आहे. या प्रसंगी छोट्याशा चुकीसाठीही हुकूमशहा किम जोंग-उन कठोर शिक्षा देतो. यापूर्वीही त्याच्या वडिलांच्या जयंती दिवशी बागेत फुलं न उमलल्याने त्याने बागेत काम करणाऱ्या माळींना शिक्षा करत त्यांना कामगार शिबीरात पाठवले होते.

     

    थंडीत लोक थरथर कापत होते

    अहवालानुसार, भाषणादरम्यान, अनेक पाहुण्यांनी हातमोजे घातले नव्हते आणि थंडीपासून कानांचे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ घातले नाहीत आणि अशा पाहुण्यांमुळे बहुतेक लोकांना भाषण ऐकणे भाग पडले.

    त्याचवेळी,किम जोंग जेथे भाषण देणार होते, तेथे विशेष व्यवस्था करण्यात आली होती आणि हीटर लावले गेले होते, ज्याच्या तारा रेड कार्पेटच्या आत जात होत्या. रिपोर्टर कॉलिन झ्विर्को यांनी असा दावा केला की प्रदीर्घ भाषणादरम्यान कम्युनिस्ट राज्य उच्चभ्रूंना उबदार ठेवण्यासाठी हीटर वापरला जात होता.

    North Korea’s Kim Jong-un uses hidden heaters as he keeps thousands standing in freezing cold for speech

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार