वृत्तसंस्था
नाशिक : राज्यात कोळसा संकट निर्माण झाल्याने औष्णिक वीजप्रकल्प बंद पडणार आहेत. परंतु, अन्य राज्यातून वीज खरेदी करून ती पुरविली जाणार आहे. राज्यात भारनियमन करणार नाही,असे महावितरणने स्पष्ट केल्यानंतर जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. No power cuts, says MSEDCL amid coal crisis
कोळशाचा साठा संपत आल्यामुळे राज्यातील महानिर्मितीचे ७ औष्णिक वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोळसा नाही म्हणून विजनिर्मिती नाही. त्यामुळे ऑक्टोम्बरमध्ये भारनियमनाचे संकट निर्माण होते की, काय या चिंतेने जनतेला ग्रासले होते.
महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भुसावळ आणि चंद्रपूर येथील प्रकल्प कोळसा साठा संपल्यामुळे बंद झाले आहेत. या प्रकल्पातून दररोज ल २१० मेगावाट वीजनिर्मिती केली जाते.
राज्यात एकूण ७ औष्णिक वीज प्रकल्प असून त्यातून दररोज ९ हजार ७५० मेगावाट विन तयार केली जाते. आता कोळसा संपत चालल्याने वीजनिर्मिती घटली असून दिवसाला ४ हजार मेगावाट वीज तयार होत आहे. काही दिवसांचा कोळसा साठा उपलब्ध आहे. कोळसा आणण्यासाठी जोराने प्रयत्न सुरु आहेत. कोळशाचा पुरवठा ५० टक्क्यांनी घटला आहे. सात प्रकल्प चालविण्यासाठी दिवसाला १.३० लाख मेट्रीक टन कोळसा लागतो.
गेल्या महिन्यापासून राज्यात कोळसा संकट सुरु आहे. पावसामुळे खाणीतून कोळसा काढण्यात व्यत्यय आला. तसेच पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.औष्णिक वीज प्रकल्पाना कोळसा उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. प्रकल्पातून वीज निर्मिती थांबली तरी राज्यात भारनियमन केले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्यला दररोज १६ ते १७ हजार मेगावाट विजेची गरज भासते. प्रकल्प बंद पडले तरी अन्य मार्गाने वीजपुरवठा केला जाईल. अन्य राज्यातून वीज खरेदी केली जाईल. त्यामुळे राज्यात त्यामुळे कोठेही विजेचे भारनियमन केले जाणार नाही,असे अधिकाऱ्यानी स्पष्ट केले आहे.
No power cuts, says MSEDCL amid coal crisis
महत्त्वाच्या बातम्या
- UNGA मधील मोदींचे संपूर्ण भाषण : संयुक्त राष्ट्रांत पंतप्रधानांनी दहशतवाद, कोरोना आणि अफगाणिस्तानसह या मुद्द्यांवर मांडले मत! वाचा सविस्तर…
- तालिबान इम्रान खानला म्हणाला कठपुतळी , अफगाणिस्तान प्रकरणापासून दूर राहण्याचा दिला सल्ला
- पालघरमधील प्रकार, दलितांच्या अंतयात्रेच्या वेळी गोंधळ करणाऱ्या तीन लोकांना अटक