विशेष प्रतिनिधी
बंगळुरू (वृत्तसंस्था) : कर्नाटक कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करेल. परंतु राज्यात रात्रीचा कर्फ्यू लावण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले. no night curfew in karanataka
ते म्हणाले, ब्रिटनमधून आलेली व्यक्ती पॉसिटीव्ह निघाल्याचे समजले आहे. त्यामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची चाचणी घेण्यात येईल. कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाईल. no night curfew in karanataka
पंतप्रधान कोरोनाबाबत गंभीर आहेत. परंतु राज्यात रात्रीच्या कर्फ्यूची गरज नाही. राज्यातील विमानतळ आणि बंदरावर येणाऱ्या प्रत्येक ब्रिटनच्या प्रवाशाची कसून तपासणी केली जाईल.
no night curfew in karanataka
दरम्यान, ब्रिटनहून येणारी विमाने रद्द केली आहेत,असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले. बंगळुरू आणि मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर 7 डिसेंबरपासून ब्रिटनहून आलेल्या सर्व प्रवाशांचा तपशील देण्यास सांगितले आहे.