• Download App
    मेंदूच्या वाढीसाठी बंदिस्त वातावरण नको। No closed environment for brain growth

    मेंदूच्या वाढीसाठी बंदिस्त वातावरण नको

    आपली शेकडो कामं मेंदू बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपला चेहरा, पेहराव यांची जेवढी काळजी घेतो, त्यापेक्षा मेंदूची अधिक काळजी घ्यायला हवी. आपण आनंदी, मोकळ्या वातावरणात राहिलो तर साहजिकच आपल्याला बरं वाटतं. पण जर वातावरण कंटाळवाणं असेल तर मनावर-मेंदूवर ओझं येतं. एखाद्याच्या सहवासात अर्धा तासही नकोसा वाटतो, कारण तो सहवास कंटाळवाणा असतो. ज्या ठिकाणी प्रेम नाही, तिथे राहणं- थांबणं नकोसं वाटतं. बंदिस्त वातावरण असेल तर तिथून लगेच निघून यावंसं वाटतं. कारण आनंदाची भावना मेंदूत सुखद हार्मोन्स निर्माण करते. हेच हार्मोन्स पुन्हा पुन्हा हवेसे वाटतात. No closed environment for brain growth

    याउलट जेव्हा कठोर वागणूक मिळतो, तो नकारात्मक अनुभव टाळावासा वाटतो. तिथून सुटका करून घ्यावीशी वाटते. कंटाळवाण्या वातावरणात कसलेच आव्हान नसते. ज्यात आव्हान नाही, तिथे कंटाळा येणारच. मुलांना कंटाळा आला तर ते एक मिनिटही थांबू शकत नाहीत. आई-बाबांच्या मागे लागून आपली सुटका करून घेतात. शाळेतल्या वर्गामध्येही बऱ्याचदा बंदिस्त वातावरण असते. प्राथमिक शाळेतल्या मुलांना केवळ खडू-फळा यांच्या सहाय्याने शिकवलं, दिवसभर बाकांवर जखडून ठेवलं तर ते त्यांच्या मेंदूसाठी घातक आहे. पाय मोकळे करायला, मित्र-मत्रिणींशी बोलायला-खेळायला फक्त मधल्या सुट्टीचाच वेळ असेल तर अशी मुलं कंटाळणारच. त्यामुळेच शाळा सुटल्यानंतर आनंदाने मोठ्ठा आवाज करत मुलांचा लोंढा वेगात बाहेर पडतो, कारण त्यांची सुटका झालेली असते!

    No closed environment for brain growth

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!