- घोषणा भारत बंदच्या; बातम्या चक्का जाम, रेल रोकोच्या
- बंद १०० टक्के कुठेच नाही; भाजपेतर राज्यांमध्ये वेगळीच आंदोलने
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलकांनी भारत बंदच्या घोषणा दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात भारत बंद नव्हे, तर बुलंद ठरला… हा ट्रेंड जोरात सुरू आहे आत्ता सोशल मीडियावर. ट्विटर ट्रेंडवर भारत बंद नही, बुलंद है हा हॅशटॅग आत्ता जोरात सुरू आहे. NO bharat bandh bharat buland
शेतकरी आंदोलकांनी आणि त्यांच्यात शिरकाव करून काँग्रेससह सर्व विरोधकांनी पुकारलेला भारत बंद देशभर पूर्ण न होताच दुपारी तीन वाजता संपला. शेतकरी आंदोलकांनी घोषणा तर भारत बंदच्या केल्या होत्या. त्याप्रमाणे काही शहरे, नगरे आणि गावांमध्ये बंद पाळण्यात आलाही.
आज भारत बंद है विरूद्ध हर शहर चालू है; सोशल मीडिया वॉर
पण त्यातही प्रामुख्याने बातम्या आल्या त्या बंद पाळण्यापेक्षा चक्का जाम, रास्ता रोको आणि रेल रोकोच्या. आंदोलनाचे हे जाहीर केल्यापेक्षा वेगळे स्वरूप देशभर पाहायला मिळाले. विशेषतः काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारची बंद सोडून आंदोलने झाली.
NO bharat bandh bharat buland
दुपारी तीननंतर बंदची हवा तर पूर्ण ओसरून गेली. त्यानंतर बंद फसल्याचा ट्रेंडही काही वेळ चालला. पण सायंकाळी ७.०० नंतर भारत बंद नही, बुलंद है हा हॅशटॅग ट्विटरवर टॉपवर आला. तो सायंकाळनंतरही टॉपवर होता. सकाळी भारत बंदचा हॅशटॅग जोरात असतानाच बंद विरोधी काही हॅशटॅगही जोरात सुरू होतेच. हमारा भारत बंद नही होगा या हॅशटॅगला चांगला प्रतिसाद मिळत होता.