विशेष प्रतिनिधी
हरिद्वार – कुंभमेळ्यात कोरोनाची साथ वेगाने पसरत असून मेळ्यात लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने नागा संन्याशींच्या मोठ्या आखाड्यांपैकी एक निरंजनी आखाड्याने कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याची घोषणा शुक्रवारी केली. या आखाड्याच्या १७ संतांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. Niranjani Akhda withdraw from kumbmela
हरिद्वार शिबिरातील अनेक संत व त्यांच्या अनुयायांना कोरोनासदृश लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे आमच्या आखाड्याच्या संतांनी कुंभमेळ्याची सांगता करण्याचा निर्णय घेतला आहे. या आखाड्याच्या ज्या १७ संतांना कोरोना झाला आहे,
त्यांनी रॅपिड अँटिजेन चाचणी केली होती. संसर्ग झालेल्या संतांना त्यांच्या छावण्यांमध्ये विलगीकरणात ठेवले जात आहे. आनंद आखाड्यानेही शनिवारी कुंभमेळ्या त त्यांचा शेवटचा दिवस असेल, असे काल जाहीर केले होते. मात्र कुंभमेळा लवकर संपविण्यावर सर्व आखाड्यांचे एकमत होऊ शकलेले नाही.
Niranjani Akhda withdraw from kumbmela
महत्वाच्या बातम्या
- गरीब देशांमध्ये महिलांचे भोग काही केल्या सरेनात, त्यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध, ‘यूएन’च्या अहवालातील माहिती
- सीआयएससीईने दहावी-बारावीच्या परीक्षा केल्या स्थगित, अंतिम निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात
- शोलेचा डायलॉग भाजप नेत्याला पडला महागात, २४ तासांत खुलासा करण्याचा आयोगाचा आदेश
- येडीयुरेप्पा, दिग्विजयसिंह, सुरजेवाला यांनाही कोरनाने गाठले, राजकीय नेत्यांमध्ये मोठी लागण