• Download App
    निरज चोप्रा : महाराष्ट्राचाच वंशज ! सदाशिव भाऊंच्या पराक्रमाचा साक्षिदार...पानीपत गाजवणार्या मराठी वीरांच तेज...!Niraj Chopra: He is a descendant of Maharashtra ...! Road Maratha community witnesses Sadashiv Bhau's prowess ... Marathas spear from Panipat to Tokyo

    निरज चोप्रा : महाराष्ट्राचाच वंशज ! सदाशिव भाऊंच्या पराक्रमाचा साक्षिदार…पानीपत गाजवणार्या मराठी वीरांच तेज…!

    पानिपतच्या युद्धानंतर हरियाणात राहिलेला मराठा …रोड मराठा ! हरियाणात आजही गायले जातात भाऊंचे पोवाडे


    नीरज हा याच रोड मराठ्यांचा वंशज असून भालाफेक या पूर्वापार चालत आलेल्या कौशल्याच्या मदतीने तो आपल्या पूर्वजांची परंपरा पुढे नेत आहे.


    उत्तर भारतात, विशेष करून हरियाणा, उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी पेशव्यांच्या फौजेत गेलेल्या अनेकांचे वंशज आजही वास्तव्यास आहेत.


    माधवी अग्रवाल 

    औरंगाबाद :निरज चोप्राने आज जगभर भारताचा डंका वाजवला . अख्या भारताला अभिमान वाटेल अशी जबरदस्त कामगीरी निरजने केली .ह्याच निरजची नाळ मात्र महाराष्ट्राशी जोडलेली आहे .होय निरज महाराष्ट्राच्या मातीचा वंशज आहे आणि महाराष्ट्राचा मराठ्यांचा वंशज रोड मराठा समाजाचा सुपूूत्र असल्याचा त्याला सार्थ अभिमान आहे .हा रोड मराठा समाज आजही गातो सदाशिवराव भाऊ पेशव्यांंच्या पराक्रमाची लोकगीतं!Niraj Chopra: He is a descendant of Maharashtra …! Road Maratha community witnesses Sadashiv Bhau’s prowess … Marathas spear from Panipat directly to Tokyo

    हरियाणातील खंडरा गावातील नीरज चोप्राच्या घरी आज जल्लोष सुरू आहे .
    नीरज चोप्राचे गाव जरी हरियाणात असले. तरी त्याची नाळ एका अर्थाने महाराष्ट्राशीदेखील जोडलेली आहे. अर्थातच तिचा संबंध वर्तमानाशी नसून इतिहासाशी आहे.

    पानिपतच्या युद्धासाठी सदाशिव भाऊंच्या नेतृत्वात मराठा सैनिक उत्तरेत गेले. युद्धानंतर बरेचसे मराठा सैन्य परत आले. काही कुटुंबे पानिपतच्या युद्धानंतरदेखील उत्तरेतच राहिली, त्यातही हरियाणातच. पानिपत हे हरियाणातच आहे. एवढ्या जबरदस्त युद्धानंतर अनेकांना महाराष्ट्रात परतणे जिवावर आले. ही कुटुंबे तिथेच स्थायिक झाली. स्थानिक भाषा, संस्कृती, चालीरिती त्यांनी स्वीकारल्या. जे मराठे पानिपतच्या युद्धानंतर तिथेच राहिले त्यांना रोड मराठा म्हटले जाते. हरियाणात, विशेषत: पानिपतच्या परिसरात रोड मराठा मोठ्या प्रमाणावर आहेत.

    त्याच रोड मराठा समाजाच्या निरज चोप्राने आज सिद्ध केले की होय तो मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षिदार असणार्या मराठ्यांचा वीर आहे .

    योगायोग म्हणजे पानिपतच्या युद्धासाठी गेलेल्या मराठा सैन्यात पायदळ आणि घोडदळ या दोघांचाही समावेश होता. त्याकाळी मराठा सैन्याच्या अनेक हत्यारांपैकी दोन हत्यारे महत्त्वाची असत. एक म्हणजे तलवार आणि दुसरे म्हणजे भाला.

     

    अर्थात भाला हा त्याकाळात सर्वच सैनिकांकडून वापरला जायचा. नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळाले आहे ते भालाफेकितच. भाल्याने लढणे हे अत्यंक कौशल्याचे काम असायचे. नीरजने आपला वारसा सार्थ ठरवत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची जिद्द दाखवली आहे.

    मराठा सैन्याने पानिपताच्या रणभूमीवर आपले शोर्य पणाला लावले आणि नीरजने टोकियोच्या मैदानात.

    मराठ्यांची पानिपतातील भालाफेक ही टोकियोपर्यत जाऊन पोचली आहे.

    Niraj Chopra: He is a descendant of Maharashtra …! Road Maratha community witnesses Sadashiv Bhau’s prowess … Marathas spear from Panipat to Tokyo

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य