• Download App
    संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात, निलेश राणे यांची सणसणीत टीका | The Focus India

    संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात, निलेश राणे यांची सणसणीत टीका

    संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला नागडं कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल मै नंगा हूॅं…अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  Nilesh Rane attacks MP Sanjay Raut

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला नागडं कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल मै नंगा हूँ…अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. Nilesh Rane attacks MP Sanjay Raut

    सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत मैं नंगा हूॅँ असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना राणे म्हणाले, एका नोटीसला इतका घाबरला संज्या…शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?

    भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनीही राऊत यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, प्रभादेवीच्या गल्लीत बसून वषार्नुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत.

    आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्या अग्रलेखांवर टीका करताना म्हटले आहे की, कार्यकारींनी ७०० शब्दांच्या अग्रलेखात सडके, कुजके, पादरे असे शब्दभांडार खुले करून विद्वत्तेचे प्रदर्शन केले आहे. त्यापेक्षा दोन ओळी त्या ५५ लाखांबद्दल खरडल्या असत्या, तर विषय संपला असता. अर्णबवर कारवाई होते तेव्हा कायदा त्याचे काम करत होता आणि आता?

    भाजपाचे नेते राम कदम म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत सामना एक वर्तमानपत्र होतं. आता मात्र ते केवळ एका पक्षाची जाहिरात करण्यासाठी सुरू असलेलं हॅण्डबिल आहे. राम मंदिराचा निर्णय लवकर लागू नये म्हणून ज्या काँग्रेसने वकिलांची फौज उभारली, त्याच हिंदुत्वविरोधी काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत आहे. ईडीकडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला. पक्ष घाबरला. नोटीशीला घाबरायचं काय कारण? पण जर घाबरत असाल, तर कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की.

    Nilesh Rane attacks MP Sanjay Raut

    सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण चालवायला क्षमता लागते. क्षमता नसली ती सरकार पाडणार, सरकार पाडणार, सरकार पाडणार अशी टेप सारखी लावली जाते. सत्तेवर आहात तर जनहिताची कामे करा. गोरगरिबांना पॅकेज नाही. शेतकऱ्यांना मदत नाही. सरकार पाडणारची टेप बंद करून या प्रश्नांवर काही कृती करा, असा सल्ला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला आहे.

    Related posts

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!