विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनामुळे देशात आणि राज्यात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना आणि त्यासोबत नवीन अभ्यासक्रमांना ऑनलाईन मान्यता मिळणार आहे. त्यासाठी नवीन योजना परिषदेने आणली आहे. New engineering colleges will get online permission
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या या योजनेमुळे केवळ आभासी पद्धतीने नवीन महाविद्यालयात असलेल्या सोयी-सुविधा आणि त्यासाठीची पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत मान्यता घेण्यासाठी विविध स्तरांवरून येणाऱ्या अडचणी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालय आणि नवीन अभ्यासक्रमाला मान्यता देताना परिषदेकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर परिषदेकडून तज्ज्ञांची टीम त्या महाविद्यालयांना भेट देते. त्यासाठीचा अहवाल तयार करते. त्यानंतर त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर परिषद योग्य तो निर्णय घेते; मात्र कोरोनामुळे प्रत्यक्ष भेट देणे शक्य नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.
महाविद्यालयांनी डिजिटल स्वाक्षरीसह अर्ज परिषदेकडे सुपूर्द केल्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया पार पडल्यानंतर भेटी ऑनलाईनच होणार आहेत. त्यासाठी संस्थांना व्हिडीओ अपलोड करणे बंधनकारक असेल. त्याचबरोबर लाईव्ह व्हिडीओही करावा लागणार आहे. त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मान्यतेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे परिषदेतर्फे सांगण्यात आले.
New engineering colleges will get online permission
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Updates राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तब्बल 48 हजार जणांना डिस्चार्ज
- प्रायव्हसी पॉलिसी कायद्यानुसारच असल्याचे व्हॉट्सअॅपचे न्यायालयात स्पष्टीकरण, पालन केले नाही तर अकाऊंट नष्ट केले जाणार
- भारतातील लसीकरणाविरुध्द षडयंत्र : डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा आणि जेकब पुलियल यांची लसीविरुध्द याचिका
- लोकांना धीर देण्याऐवजी विरोधक घाबरवत आहेत, योगी आदित्यनाथ यांचा आरोप