• Download App
    नव्या कॉरिडॉरमुळे मालगाडीचा वेग तीनपट, शेतकऱ्यांना होणार फायदा | The Focus India

    नव्या कॉरिडॉरमुळे मालगाडीचा वेग तीनपट, शेतकऱ्यांना होणार फायदा

    ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर या कॉरिडॉरमुळे मालगाड्यांचा वेग तीनपट होईल. डबल माल वाहून नेला जाऊ शकतो. या ट्रॅकवर डबल डेकर वस्तूंच्या गाड्या चालवल्या जाऊ शकतात. यामुळे व्यवसाय वाढेल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. व्यापारी असो, शेतकरी असो वा ग्राहक, सर्वांनाच त्याचा फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. new corridor will triple the speed of freight trains, benefiting farmers

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर या कॉरिडॉरमुळे मालगाड्यांता वेग तीनपट होईल. डबल माल वाहून जाऊ शकतो. या ट्रॅकवर डबल डेकर वस्तूंच्या गाड्या चालवल्या जाऊ शकतात. यामुळे व्यवसाय वाढेल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. व्यापारी असो, शेतकरी असो वा ग्राहक, सर्वांनाच त्याचा फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या न्यू भाऊपुर-न्यू खुर्जा सेक्शनचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. याचा फायदा म्हणजे कानपुर-दिल्ली रुटवर ट्रेन लेट होणार नाहीत. मालगाड्या देखील योग्य वेळेवर पोहोचू शकतील. मोदींनी ऑपरेशनल कंट्रोल सेंटरचीही सुरुवात केली.

    मोदी म्हणाले की, हा दिवस भारतीय रेल्वेच्या गौरवशाली भुतकाळाला 21 व्या शतकाची नवी उंची देणारा आहे. आपण पाहत आहोत की सर्वात मोठा आणि आधुनिक रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. मोदी म्हणाले की, नवीन फ्रेट कॉरिडॉरमधील व्यवस्थापन आणि डेटाशी संबंधित तंत्रज्ञान भारतातच तयार केले गेले आहे. पायाभूत सुविधांचा विकास हा कोणत्याही देशाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. ते जितके अधिक मजबूत होईल तितक्या वेगाने देशाचा विकास होईल.

    new corridor will triple the speed of freight trains, benefiting farmers

    गेल्या सहा वर्षांत, आधुनिक कनेक्टिव्हिटीचे प्रत्येक अंग भारतात कार्यरत आहे. हायवे असो, रेल्वे असो आणि पाण्याचा मार्ग आणि आयवे. या पाच चाकांना वेग देण्यात येत आहे. यामुळे रेल्वेची सेवा अधिक गतिमान आणि तत्पर होईल ज्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि अन्य ग्राहकांना होईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…