• Download App
    NAVI MUMBAI AIRPORT: ‘आता आमचा निर्धार ठाम, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव’; तांडेल मैदानात आंदोलन ; पोलिसांचा कडक बंदोबस्त;महिलांचा उस्फूर्त सहभाग Navi Mumbai Airport : Naming Controvercy Demanding DB Patil Cidco Gherao Andolan

    NAVI MUMBAI AIRPORT: ‘आता आमचा निर्धार ठाम, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव’; तांडेल मैदानात आंदोलन ; पोलिसांचा कडक बंदोबस्त;महिलांचा उस्फूर्त सहभाग

    • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. यामुळे सिडको घेराव आंदोलन आज पुकारण्यात आलं आहे.

    • आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. हातात दि.बा पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी दि.बा पाटलांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी .

    • नवी मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत वाहतूक बंद असणार आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वादाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्दा चिघळला असून  राज्य सरकारने आधीच या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं असल्याचं जाहीर केलं आहे.Navi Mumbai Airport : Naming Controvercy Demanding DB Patil Cidco Gherao Andolan

    या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फौजफाटा वाढवला आहे. जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी आहेत.

    या आंदोलनालात जवळजवळ एक लाखांहून अधिक स्थानिक नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीने दिली आहे. यामुळे आता या संपूर्ण परिसरात प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे सिडको भवन परिसराला आता छावणीचं स्वरुप आलं आहे.

    आंदोलनामुळे वाहतुकीत बदल

    दरम्यान, या आंदोलनाची दखल घेवून पोलिसांनी तब्बल 12 तास नवी मुंबई शहरातील अंतर्गत रस्ते वाहतूक बंद करून पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे. याचा परिणाम मुंबई-बंगळुरू, गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर होणार आहे.

    भूमिपुत्रांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्द्यावर सायन-पनवेल महामार्गालगत असलेल्या सिडको भवन या इमारतीला घेराव घालण्याचा इशारा दिल्यावर वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

    Navi Mumbai Airport : Naming Controvercy Demanding DB Patil Cidco Gherao Andolan

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस