• Download App
    Navi Mumbai Airport Issue: बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं; छगन भुजबळांचा घरचा आहेर;आघाडीत पुन्हा 'ती'मत Navi Mumbai Airport Issue: If it was Balasaheb Thackeray, he would have denied the name of the airport; Chhagan Bhujbal

    Navi Mumbai Airport Issue: बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं ; छगन भुजबळांचा घरचा आहेर ; आघाडीत पुन्हा ‘ती’मत

    नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली .


    या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.


    यावरुन आता आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे .


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक: नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली मात्र या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केलं. या नामकरणावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे .Navi Mumbai Airport Issue: If it was Balasaheb Thackeray, he would have denied the name of the airport; Chhagan Bhujbal

    बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चं नाव देणं नाकारलं असतं, असं वक्तव्य करत त्यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यामुळे नामकरणासाठी लढणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला बळ मिळण्याची शक्यता असून नामकरणाच्या मुद्दयावरून आघाडीत बिघाडी असल्याचं समोर आलं आहे.

    छगन भुजबळ यांनी  पत्रकारांशी बोलताना हे विधान केलं आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वत:चं नाव विमानतळाला देणं नाकारलं असतं. जे. आर. डी. टाटा यांचं नाव विमानतळाला सूचवलं असतं, असं सांगतानाच नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. मात्र, हे सांगतानाच बाळासाहेब आणि दि.बा. पाटील या दोन्ही नावाला आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    भुजबळ यांनी थेट नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सुनावले आहे . त्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

    Navi Mumbai Airport Issue: If it was Balasaheb Thackeray, he would have denied the name of the airport; Chhagan Bhujbal

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!