विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, पुणे : कोविड महामारीच्या काळात अनेक लहान मुलं अनाथ झाली .कुणी आपले मातृछत्र गमावले तर कुणी पितृछत्र .कुणी दोघांच्या प्रेमाला मुकले .अशा परिस्थितित अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्यास अनेक संस्था,व्यक्ति पुढे येतात .कुणाला त्यांना दत्तक घ्यायचे असते कुणाला त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलायचा असतो तर कुणाला त्यांच्या महिन्याचा खर्च, मात्र हे कसे करायचे ? याला काही कायदेशीर प्रक्रिया आहे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि कोरोना सारख्या महामारीमध्ये लहान मुलांसोबत कुठलाही गैरप्रकार होऊ नये याकरीता जागृती करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) आणि आनंदी एम्पाॅवर फाउंडेशनने आज (दि. २०) राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते .
National seminar by NCPCR and Anandi Foundation on adoption of orphanages in covid times answers of all the questions about adoption
‘एनसीपीसीआर’चे अध्यक्ष प्रियांक कानुनगो आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या परिसंवादात मार्गदर्शन केले .हा परिसंवाद वर्च्युएल पद्धतीने आयोजित करण्यात आला होता .
कोरोनाच्या संकटाने अनेक मुले अनाथ झाली आहेत. मात्र, या मुलांना अनधिकृतपणे आणि बेकायदारीत्या दत्तक घेत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर एनसीपीसीआर आणि आनंदी फाऊंडेशनने हा परिसंवाद आयोजित केला . यामध्ये मदुराई उच्च न्यायालयातील अतिरिक्त साॅलिसिटर जनरल व्हिक्टोरिया गौरी, मध्य प्रदेश बाल आयोगाच्या माजी सदस्य डाॅ. आर.एच. लता, दत्तक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते विजय डोईफोडे अॅडव्होकेट सेजल पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .
देशभरातील सामाजिक संस्था, विविध आयोगांचे अध्यक्ष व सदस्य यात सहभागी झाले होते . परिसंवादाच्या शेवटी सहभागी मान्यवरांना अनेक प्रश्न विचारण्यात आले .
‘द फोकस इंडिया’ हे या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते, तर ‘अराईज टू लीड’ ही संस्था नाॅलेज पार्टनर यांनी हया परिसंवादाचे आयोजन केले होते .