• Download App
    कोविडमधील अनाथांना दत्तक घेताना गैरप्रकार… राष्ट्रीय बाल आयोग व आनंदी फाउंडेशनकडून आज राष्ट्रीय परिसंवाद National seminar by NCPCR and Anandi Foundation on adoption of orphanages in covid times

    कोविडमधील अनाथांना दत्तक घेताना गैरप्रकार… राष्ट्रीय बाल आयोग व आनंदी फाउंडेशनकडून आज राष्ट्रीय परिसंवाद

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली, पुणे : कोविड महामारीच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेताना असलेल्या कायदेशीर प्रक्रिया, सध्या होत असलेले काही गैरप्रकार या सर्वांवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) आणि आनंदी एम्पाॅवर फाउंडेशनने आज (दि. २०) राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले आहे. National seminar by NCPCR and Anandi Foundation on adoption of orphanages in covid times

    ‘एनसीपीसीआर’चे अध्यक्ष प्रियांक कानुंगो आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर या परिसंवादात मार्गदर्शन करणार आहेत. हा परिसंवाद दि. २० रोजी सकाळी ११ ते १२.३० दरम्यान वर्च्युएल पद्धतीने होणार आहे.

    कोरोनाच्या संकटाने अनेक मुले अनाथ झाली आहेत. मात्र, या मुलांना अनधिकृतपणे आणि बेकायदारीत्या दत्तक घेत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर एनसीपीसीआर आणि आनंदी फाऊंडेशनने हा परिसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये मदुराई उच्च न्यायालयातील अतिरिक्त साॅलिसिटर जनरल व्हिक्टोरिया गौरी, मध्य प्रदेश बाल आयोगाच्या माजी सदस्य डाॅ. आर.एच. लता, दत्तक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते विजय डोईफोडे मार्गदर्शन करणार आहेत.

    देशभरातील सामाजिक संस्था, विविध आयोगांचे अध्यक्ष व सदस्य यात सहभागी होतील. ‘द फोकस इंडिया’ हे या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे, तर ‘अराईज टू लीड’ ही संस्था नाॅलेज पार्टनर आहे.

     

    National Seminar By NCPCR And Anandi Foundation On Adoption Of Orphanages In Covid Times

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस