नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना संमेलन स्थळी जाण्यासाठी गो ग्रीन कॅबद्वारे मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे.
‘गो ग्रीन’ हा उपक्रम नाशिकमधील तीन महिलांनी सुरू केला आहे. उद्योग व्यवसायात महिला देखील पुढे येत आहे. ही आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना संमेलन स्थळी जाण्यासाठी गो ग्रीन कॅबद्वारे मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे,
विशेष प्रतिनिधी
नाशिकः नाशिक शहरात प्रदूषण वाढू नये म्हणून आतापासूनच प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शहरात रविवारी Go Green Cab सेवा सुरू करण्यात आली.या सेवेसाठी तीन महिला उद्योजकांनी पुढाकार घेतला असून, त्यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.NASHIK SAHITYA SANMELAN
पालकमंत्री छगन भुजबळ आणि महापौर सतीश कुलकर्णी यांनी या सेवेला हिरवा झेंडा दाखवला. जगात सगळीकडे होणारे प्रदूषण कारखान्यापेक्षा जास्त वाहनांतून होते. त्यामुळे संपूर्ण जग हो ग्लोबल वॉर्मिंगला सामोरे जात असून, त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावे लागत आहेत. यातून बचाव करण्यासाठी आपल्याला प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रदूषण विरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले.
‘गो ग्रीन’चे संचालक हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या यांनी इलेक्ट्रिक कॅब्स सर्व्हिसेस च्या माध्यमातून ‘गो ग्रीन’ ही सेवा सुरू केली आहे. ज्याचा उद्देश, नाशिककरांना पर्यावरणापूरक, आणि निसर्गाशी जोडू पाहणारे आयुष्य देणे, हाच होता.
नाशिक मध्ये वाढत्या वाहनांच्या प्रदूषणावर तोडगा काढणे, हे ह्या संकल्पनेमधील पहिले पाऊल होते, आणि त्याचीच प्रचिती म्हणून इलेक्ट्रिक कॅब्स ही संकल्पना उदयास येऊन, ती त्यांनी प्रत्यक्षात आणली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.