• Download App
    Nashik magnet man : ना अजब ना गजब !चमत्कार नाही तर हा साधा प्रयोग ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा ; लसीबाबत गैरसमज न पसरवण्याचे आवाहन Nashik magnet man: No wonder! This is a simple experiment not a miracle! Maharashtra Superstition Elimination Committee claim; Appeal not to spread misconceptions about vaccines

    Nashik magnet man : ना अजब ना गजब ! चमत्कार नाही तर हा साधा प्रयोग ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा ; लसीबाबत गैरसमज न पसरवण्याचे आवाहन

    • नाशिकच्या सिडको परिसरातील अरविंद सोनार यांचा दावा-
      कोविशिल्डची दुसरी लस घेतल्यानंतर हातात चुंबकत्व

    • सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

    • अनिस कार्यकर्ते अण्णा कडलासकर ह्यांनी नाशिक मधील चुंबकत्व दाव्याचा फोलपणा सिद्ध केला.

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस घेतल्यानंतर अंगाला चमचे नाणी अंगाला चिकटत असल्याचा दावा नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक अरविंद सोनार यांनी  केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकूण प्रकाराबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश देखील दिले . मात्र,आता लसीबाबत हा चमत्काराचा दावा फोल असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्पष्ट केले आहे . Nashik magnet man: No wonder! This is a simple experiment not a miracle! Maharashtra Superstition Elimination Committee claim; Appeal not to spread misconceptions about vaccines

    कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर सिडकोतील शिवाजी चाैकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ देखील गोंधळात पडले असल्याचे सांगितले जात होते. अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी सपत्नीक कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे.

    त्यामुळे आता प्रतिपिंड तयार होणार अशी त्यांची भावना असताना भलताच प्रकार पुढे आला असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर काल रात्री बघितले आणि त्यामुळे त्यांनी सहज आपल्या आई वडिलांची चाचणी घेतली तर आईला असे काही झाले नाही मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड स्टीलच्या वस्तु चिकटू लागल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या परिचित खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी संपर्क साधला मात्र त्यांनी देखील हा अजब प्रकार असल्याचे सांगितले होते.

     

    https://m.facebook.com/story.php?story_fbid=1065096864020376&id=100015602171173&sfnsn=wiwspmo

    मात्र आता हा सर्व प्रकार फोल असल्याचं महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीने म्हणलं आहे. अंनिसच्या अण्णा कडलासकर यांनी असाच प्रयोग करून अंगाला वस्तू चिकटू शकतात हे दाखवले आहे. कडलासकर यांच्यामते नाणे किंवा उलतणे हे थोडे ओले करून घेतले आणि पोट दंड पाठ यावर हलकेसे दाबले तर निर्वात पोकळी निर्माण होऊन वास्तू चिकटून राहते. पाणी सुकल्यावर मात्र ती पडते.

    तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख म्हणाले ,”एकाच व्यक्तीचा बाबतीत हा प्रकार कसा झाला? कोविशिल्ड टोचणे आणि चुंबकत्व येणे याचा काही संबंध नाही. लोहचुंबकाला लोखंड म्हणजे नाणी चिकटू शकतात पण स्टेनलेस स्टील नाही. त्यामुळे हा दुसराच काही तरी प्रकार आहे. लोकांनी या गोष्टीला दैवी चमत्कार समजू नये आणि कोविशिल्डच्या बाबतीत असे गैरसमज पसरवले जाऊ शकतात.

    याविषयी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर म्हणाले की, कारोनाची लस आणि अंगाला नाणी आणि भांडी चिकटण्या मागे साधा पदार्थ विज्ञानाच्या नियम आहे. त्याचा करोना लसीकरणाशी संबंध जोडणे चुकीचे आहे. लसीकरण हे करोना विरोधी लढ्यातील महत्वाचे शस्त्र आहे. त्याविषयी सनसनाटी दावे करण्याआधी त्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे.

    या प्रकाराची चौकशी करण्याचे राजेश टोपेंचे आदेश

    वैद्यकीय चाचण्या करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, यामागे नक्की काय आहे, ते तपासले जाईल. मेडिकल कारण काय आहे, हे तपासू या. त्यानंतर नक्की कशामुळे हे झाले आहे, ते पाहू.

    Nashik magnet man: No wonder! This is a simple experiment not a miracle! Maharashtra Superstition Elimination Committee claim; Appeal not to spread misconceptions about vaccines

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य