नाशिक – दिवाळखोरीच्या कर्दमात अडकलेली भारतीय अर्थव्यवस्थेची नौका पी. व्ही. नरसिंह राव यांनी आपल्या राजकीय कौशल्याने पैलतीरी नेली. आजच्या भारताच्या आर्थिक प्रगतीची बीजे नरसिंह राव यांच्या आर्थिक सुधारणा धोरणात आहेत. नरसिंह रावांनी केवळ देशाला आर्थिक सुधारणेची दिशाच दिली असे नाही, तर त्यांनी भारताच्या नव्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचा पायाही घातला. चीनला शह देण्यासाठी तैवानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. इस्त्राएलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारे नरसिंह राव हे पहिले पंतप्रधान. त्याच बरोबर पोखरणच्या अणूस्फोटाची तयारी करणारेही तेच…, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक अरविंद व्यं. गोखले यांनी केले. Narasimha Rao is also the father of indian foriegn policy`s look east doctrine, says Arvind V. Gokhale
१९९१ च्या भारतीय आर्थिक सुधारणांचे भीष्मपितामह माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दीची आज २८ जून २०२१ रोजी सांगता झाली. यानिमित्त द फोकस इंडियाने घेतलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. बहुभाषा पांडित्य हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा पैलू.
देशाच्या आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून नरसिंह रावांना आता अधिमान्यता मिळू लागली आहे. त्यांना भारतरत्न देणे हे अगदी औचित्यपूर्ण ठरेल, असे सांगून श्री. गोखले म्हणाले, की नरसिंह रावांनी त्यांच्या समोर असलेल्या राजकीय आव्हानांचा यशस्वी मुकाबला करून भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचाही पाया घातला. चीनशी वाटाघाटी केल्या. त्याचवेळी त्यांनी चीनला शह देण्यासाठी तैवानशीही राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. इस्त्राएलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करावेत ही उजव्या पक्षांची कायम मागणी राहिली होती. पण ती पूर्ण करणारे नरसिंह राव काँग्रेसचे पंतप्रधान होते, याकडे श्री. गोखले यांनी लक्ष वेधले.
आज लूक इस्ट पॉलिसीचे रूपांतर ऍक्ट इस्ट पॉलिसीत झाले आहे. पण लूक इस्ट पॉलिसी ही नरसिंह रावांनी परराष्ट्र धोरणाला दिलेली देणगी आहे. जपानपासून दक्षिण कोरिया, सिंगापूरपर्यंतच्या प्रगत देशांशी भारताचे संबंध नरसिंह रावांच्या काळात सुधारले. त्याच बरोबर अग्नेय आशियायी संबंध सुधारण्याचा पायाही नरसिंह राव यांनी घातला, असे श्री. गोखले यांनी स्पष्ट केले.
Narasimha Rao is also the father of indian foriegn policy`s look east doctrine, says Arvind V. Gokhale
महत्त्वाच्या बातम्या