Saturday, 10 May 2025
  • Download App
    NANDED : औरंगाबाद-अकोला आता नांदेडमध्ये ओमायक्रॉन ! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह NANDED: Aurangabad-Akola now Omaicron in Nanded! The report of the two from South Africa is positive

    NANDED : औरंगाबाद-अकोला आता नांदेडमध्ये ओमायक्रॉन ! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह

    मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोन जण ओमिक्रॉनची लागण झाली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नांदेड:  ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या रुपाचे संकट महाराष्ट्रात विस्तारताना दिसत आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात दररोज रुग्ण आढळत आहेत. अकोला, औरंगाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळल्यानंतर आता मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातदेखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.NANDED: Aurangabad-Akola now Omaicron in Nanded! The report of the two from South Africa is positive

     

    येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    हिमायतनगर येथे मागील आठवड्यात तिघे जण दक्षिण आफ्रिकेतून आले होते. खबरदारी म्हणून या तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. दरम्यान तिघांपैकी दोघे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती येथील आरोग्य विभागाने दिलीय.

    अकोला, औरंगाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव

    मागील काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. काल म्हणजेच 26 डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्यात एका महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ही महिला काही दिवसांपूर्वी दुबईतून परतली होती. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातदेखील 25 डिसेंबर रोजी दोघांचा ओमिक्रॉन अवहाल पॉझिटिव्ह आला होता.

    NANDED: Aurangabad-Akola now Omaicron in Nanded! The report of the two from South Africa is positive

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??