• Download App
    नाना म्हणाले, "मिठी मित्राला मारायची नाही, तर काय दुष्मनाला मारायची?", मित्र कोण ते कळले...; पण दुश्मन कोण?? Nana Patrole says Devendra Fadanavis is his long times friend

    नाना म्हणाले, “मिठी मित्राला मारायची नाही, तर काय दुष्मनाला मारायची?”, मित्र कोण ते कळले…; पण दुश्मन कोण??

    नाशिक : महाराष्ट्रातून होणारी राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जे प्रयत्न चालवले आहेत त्यातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नागपुरात बोलून गेले, की “मिठी मित्रांना मारायची नाही तर काय दुश्मनांना मारायची?”, यातले मित्र कोण हे सगळ्या महाराष्ट्राला कळले. कारण ते नानांनीच उघडपणे सांगितले. महाराष्ट्राचा नानांवर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत हे आम्ही जगजाहीर सांगतो, असे ते पत्रकारांना म्हणाले… पण मग नानांच्या वक्तव्यातला “दुश्मन” कोण??, नाना नेमके कुणाला “दुश्मन” म्हणालेत?? Nana Patrole says Devendra Fadanavis is his long times friend

    नानांचे मित्र सध्या विरोधी पक्ष नेतेपदावर आहेत. मग नानांचे दुश्मन कुठे आहेत? असे प्रश्न महाराष्ट्राला यानिमित्ताने पडू लागले आहेत. नानांनी ताबडतोब “मित्र” या संकल्पनेचा जरूर खुलासा केला आहे. ते म्हणालेत, की देवेंद्र फडणवीस माझे मित्र असले तरी काँग्रेस आणि भाजप यांची राजकीय विचारसरणी एक होऊ शकत नाही, पण देशहितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो. नानांच्या या वक्तव्यातून फडणवीस आणि स्वतः नाना यांच्यातला मैत्रीचा पुरेसा खुलासा झाला. परंतु त्यांनीच उच्चारलेला शब्द “दुश्मन” याचा मात्र खुलासा नेमका होऊ शकला नाही. तो त्यांनी केलाही नाही. ते फक्त एवढेच म्हणाले, की माझ्या वक्तव्याचा वेगळा राजकीय अर्थ काढू नका…!! आता नेमका या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा?

    नानांचे वैयक्तिक मित्र देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. मग त्यांचे दुश्मन नेमके कुठे आहेत?? ते दुश्मन राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत नेमके काय करणार आहेत?? नानांना मित्रांना मिठी मारावीशी वाटणे स्वाभाविक आहे, पण दुश्मनांसोबत ते काय करणार आहेत??, याचा मात्र खुलासा नानांनी अद्याप केलेला नाही…!!

    राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी तळमळ नानांना जरूर आहे. पण ती निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी नेमके कोण प्रयत्न करत आहे? तेच त्यांचे “दुश्मन” आहेत का? निवडणूक व्हावी आणि काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांना दगाफटका व्हावा, असे नेमके कोणाला वाटते…?? मित्रांना वाटते का?? तसे वाटत असल्यास भविष्यकाळात ते “मित्र” राहतील का?? आणि दगाफटका करणारे दुश्मन नेमके कोण असतील??, याचा खुलासाही अद्याप नानांनी केलेला नाही. तो नाना लवकरच करतील अशी अपेक्षा महाराष्ट्राला आहे…!! अशी अपेक्षा ठेवायला नानांची हरकत नसेल ना…??

    Nana Patrole says Devendra Fadanavis is his long times friend

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!