विशेष प्रतिनिधी
येवला : येवला तालुक्यातील पुरणगाव येथील रहीम शेख या मुस्लिम तरुणांने आपल्या घरात आज गणरायाची स्थापना केली आहे. Muslim youth worship Ganesha every year, This year Also
या मुस्लिम तरुणाने गावातील गणपती मंदिरात नवस केला होता की मला दोन मुली आहे ,मात्र मला मुलगा दे गणराया मी तुझी प्रतिष्ठापना माझ्या घरात करेन .त्याच्या नवसाला गणपती पावला व त्याला मुलगा झाला.
तेव्हा पासून नित्यनेमाने दर गणेशोत्सवामध्ये हा मुस्लिम तरुण आपल्या घरात गणरायाची प्रतिष्ठापना करीत असतो. या वर्षी देखील या तरुणाने आपल्या घरामध्ये गणरायाची स्थापना करून विधिवत पूजा केली.
- – गावातील गणपती मंदिरात नवस केला होता
- – नवसाला गणपती पावला आणि मुलगा झाला
- – नवस फेडण्यासाठी अनेक वर्षापासून पूजन
- – घरामध्ये गणरायाची स्थापना करून विधिवत पूजा
Muslim youth worship Ganesha every year, This year Also