तथाकथित बुध्दीवाद्यांमध्ये अद्यापही फाळणीची मानसिकता असल्यानेच कोट्यवधी मुस्लिमांना यातना भोगाव्या लागत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तथाकथित बुध्दीवाद्यांमध्ये अद्यापही फाळणीची मानसिकता असल्यानेच कोट्यवधी मुस्लिमांना यातना भोगाव्या लागत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
Muslim community sambit patra latest news
एका वृत्तवाहिनीवर चर्चेमध्ये मुस्लिम विचारवंत अतीक उर रहमान यांनी आरोप केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुध्दीवादाशी काही संबंध नाही. यावर संबित पात्रा यांनी प्रश्न केला की तुमच्याकडे कोणते मीटर आहे ज्यामध्ये तुम्ही बुध्दीवादाची मोजणी करता.
अलिगड मुस्लिम विद्यापीठाने पाकिस्तान बनविण्यात मोठी भूमिका बजावली होती. अलिगड विद्यापीठाचा भारतीय जनता पक्षाशी काहीही संबंध नाही तर मग पाकिस्तान, बांग्लादेश आणि तुर्कस्थान यांच्याशी काय संबंध आहे, याचे उत्तरही देण्याची गरज आहे, असे पात्रा म्हणाले.
फाईल फोटो
Muslim community sambit patra latest news
मुस्लिम समाजातील तथाकथित बुध्दीवाद्यांनी कायमच भेदाचे राजकारण केले. भारतीय मुसलमान देशाच्या संस्कृतीत मिसळून जाण्यासाठी तयार असताना त्याला विरोध केला, असे प्रतिपादन पात्रा यांनी केले. ते म्हणाले की, त्यामुळेच मुस्लिम समाज मागास राहिला आहे. देशातील कोट्यवधी मुसलमानांना ज्या यातना भोगाव्या लागत आहेत, त्याला हे तथाकथित बुध्दीवंतच जबाबदार आहेत.