विशेष प्रतिनिधी
वर्धा : काश्मीरमध्ये हिंदूंच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी वर्धा येथील बडे चौकात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पुतळा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे जाळण्यात आला.Murder Of Hindus in Kashmir ; protests in Wardha Town by VHP and Bajrang Dal
‘ पाकिस्तान को करारा जवाब दो”अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे करण्यात आली.
काश्मीर खोऱ्यात ५ दिवसांत सात भारतीयांची हत्या करण्यात आली.त्याचा निषेध नोंदवत बजरंग दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बडे चौकात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुतळा दहन केला.
बजरंग दलाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात आली की पाकिस्तानाला व आतंकवाद्यांना धडा शिकवावा. काश्मीरमध्ये नाव विचारून विचारून हिंदूंची हत्या करण्यात आली. त्यामुळे “पाकिस्तान को करारा जवाब दो” अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आंदोलनात अटल पांडे ,संजय बडगेलवार, अनिल कावळे, मुन्ना यादव, बबलू राऊत ,आदित्य कावळे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
– काश्मीरमधील ७ हिंदूंच्या हत्येचा वर्ध्यात निषेध
– विश्व हिंदू परिषद, बजरंग दल झाले आक्रमक
-काश्मीर खोऱ्यात पाच दिवसांत सात हिंदूंची हत्या
– हिंदूंना नाव विचारून वेचून केले ठार
– ‘पाकिस्तान को करारा जवाब दो’ , आग्रही मागणी
– पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुतळा केला दहन