• Download App
    प्रधानमंत्री किसान योजनेतील एक हजार रुपयांच्या वादातून सख्ख्या भावाचा खून, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना Murder of brother in a dispute of one thousand rupees in Pradhan Mantri Kisan Yojana

    प्रधानमंत्री किसान योजनेतील एक हजार रुपयांच्या वादातून सख्ख्या भावाचा खून, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

    विशेष प्रतिनिधी

    लातूर : प्रधानमंत्री किसान योजनेच्या मिळालेल्या दोन हजार रुपयापैकी एक हजार मला दे म्हणून सख्या भावाचा खून करण्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील कासार जवळा येथे घडली. Murder of brother in a dispute of one thousand rupees in Pradhan Mantri Kisan Yojana

    वैजनाथ आश्रुबा सुडके (३० रा. कासार जवळा ता. लातूर ) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. पोलिसांनी त्यांचा सख्खा धाकटा नागनाथ सुडके (२८) याला अटक केली आहे.

    कासार जवळा येथील वैजनाथ आश्रुबा सुडके आणि नागनाथ आश्रुबा सुडके हे दाेघे सख्खे भाऊ आहेत. प्रधानमंत्री किसान याेजनेचे दाेन हजार रुपये वैजनाथ यांच्या खात्यावर जमा झाले हाेते. यातील एक हजार रुपये मला दे म्हणून नागनाथ याने वैजनाथकडे तगादा लावला हाेता.



    नागनाथ मद्यपी असल्याने वैजनाथने दाेन हजारातील एक हजार रुपये नागनाथ यांच्या पत्नीकडे दिले. यावरून झालेल्या भांडणात वैजनाथ यांच्या डाेक्यात नागनाथने काठी घातली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    Murder of brother in a dispute of one thousand rupees in Pradhan Mantri Kisan Yojana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…