• Download App
    MUMBAI RAINS: मुंबईची तुंबई ; BMC चे नालेसफाईचे दावे फोल ; अंधेरी सब वे बंद ; कोरोनातून अनलॉक पावसाने ब्लॉक MUMBAI RAINS: Tumbai of Mumbai; BMC's all-cleansing claims fall; Andheris subways closed; Unlocked from Corona blocked by Rain

    MUMBAI RAINS: मुंबईची तुंबई ; BMC चे नालेसफाईचे दावे फोल ; अंधेरी सब वे बंद ; कोरोनातून अनलॉक पावसाने ब्लॉक

    • पुढील ४ दिवसात शहरात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज.MUMBAI RAINS: Tumbai of Mumbai; BMC’s all-cleansing claims fall; Andheris subways closed; Unlocked from Corona blocked by Rain

    • हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर महापालिकेने शहरात पाणी साचणार नाही याची खबरदारी घेतली आहे. परंतू अनेक सखल भागांमध्ये यंदाही पाणी साचलेलं पहायला मिळालं.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: महाराष्ट्रात सर्वच ज्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात तो मान्सून आज मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे. मुंबईत सर्वसाधारणपणे १० जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होतं परंतू यंदा मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला आहे.मुंबईत आज मान्सूनने हजेरी लावली. काल रात्रीपासून मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली .मुंबईत यंदा पावसामुळे पाणी साचणार नाही असा दावा महापालिकेने केला होता. परंतू पहिल्याच प्रयत्नात हा दावा फोल ठरला आहे. सायनसह मुंबईच्या सखल भागांमध्ये  पाणी साचलं नुकतीच  कोरोनातून अनलॉक झालेली मुंबई  पावसाने ब्लॉक झाली आहे .MUMBAI RAINS: Tumbai of Mumbai; BMC’s all-cleansing claims fall; Andheris subways closed; Unlocked from Corona blocked by Rain

    मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेने  नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची  दाणादाण उडाली.

    मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे मुंबईतील अनेक रस्ते हे जलमय झाले आहेत.

    मुंबईत ११ जून पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात पुढचे ४ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली.

    मुंबईत आज दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून शहर आणि उपनगर भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मुंबईच्या ई वॉर्डात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात दुपारपर्यंत ४८.९९ एम.एम. , पूर्व उपनगरात ६६.९९ एम. एम. तर पश्चिम उपनगरात ४८.७८ एम.एम. पावसाची नोंद झाली आहे.

    मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच आभाळ दाटून आलेलं पहायला मिळालं. सकाळपासून शहरातील अनेक भागांमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून शनिवारी रत्नागिरीच्या हर्णे किनारपट्टी भागात पोहचल्याची हवामान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेनेही हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन शहरात पावसामुळे पाणी साचणार नाही तसेच कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली आहे.

    अंधेरी येथील सब वे हा पावसाचं पाणी साठल्याने बंद करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे. त्यामुळे अंधेरीतील सब वे भागात पाणी साठलं आहे. याच कारणामुळे हा सब वे बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी महापालिकेतील आपात्कालीन विभागाचे कर्मचारी उभे राहिले आहेत आणि पर्यायी मार्गांचा वापर करा असे सांगत आहेत.

    मुंबईत मान्सूनचं आगमन झालं की त्याचा पहिला फटका बसतो तो मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या मुंबई लोकल सेवेला. आज मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आणि या पावसाचा पहिलाच फटका लोकल सेवेला बसला आहे. सेंट्रल रेल्वे मार्गावर कुर्ला ते सीएसएमटी मार्गावरची लोकल सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. यानंतर पावसाचा जोर पाहता ही सेवा ठाणे ते सीएसएमटी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वे प्रशासनाने घेतला

    MUMBAI RAINS: Tumbai of Mumbai; BMC’s all-cleansing claims fall; Andheris subways closed; Unlocked from Corona blocked by Rain

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक