• Download App
    मुंबईत काँग्रेसची भाषा स्वबळाची; जगताप विरूध्द सिद्दीकी नवी लागण गटबाजीची Mumbai congress new factionalism emergred; Bhai jagtap vs zishan siddiqie

    मुंबईत काँग्रेसची भाषा स्वबळाची; जगताप विरूध्द सिद्दीकी नवी लागण गटबाजीची

    प्रतिनिधी

    मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला त्या पक्षाच्याच तरूण आमदाराने घराचा आहेर दिला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी कशी चालू आहे, याचा कच्चा चिठ्ठाच मुंबईतले तरूण आमदार झिशान सिद्दीकी यांनी खोलला आहे. Mumabi congress new factionalism emergred; Bhai jagtap vs zishan siddiqie

    झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांना पत्र लिहून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. भाई जगताप हे पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष असतानाही गटबाजी करतात. सार्वजनिक कार्यक्रमात माझ्यासारख्या पक्षाच्या आमदारालाच वगळतात, असा आरोप झिशान सिद्दीकी यांनी पत्रातून केला आहे.

    मुंबई युवक काँग्रेसच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत आमदार झिशान सिद्दिकीला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही अशी धमकी भाई जगताप यांनी पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती, असा गंभीर आरोप झिशान सिद्दीकी यांनी पत्रात केला आहे.

    कोरोना किटवाटपासारख्या कार्यक्रमात भाई जगतापांनी आपल्याला कसे वगळले याचे उदाहरण झिशान सिद्दीकी यांनी पत्रात दिले आहे. कोरोना किट वाटपाचा एक कार्यक्रम वांद्रे येथील बीकेसी पोलीस स्थानकात घेण्यात आला. त्याला काँग्रेसचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते पण, झिशान सिद्दिकी यांना बोलवण्यात आले नव्हते. बीकेसी पोलीस स्थानक हे आमदार सिद्दिकी यांच्या मतदारसंघात येते. काँग्रेसने कार्यक्रम घेऊन स्थानिक आमदाराला बोलवले नाही हा प्रोटोकॉल भाई जगतापांनी तोडला, याकडे झिशान यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.

    -मुंबई काँग्रेस गटबाजीचा इतिहास जुनाच

    मुंबई काँग्रेसला गटबाजी नवीन नाही. तिचा इतिहास जुनाच आहे. १९८५ नंतर मुंबई काँग्रेसमध्ये मुरली देवरा विरुद्ध गुरूदास कामत हे गट कार्यरत होते. दोघेही खासदार होते. नंतर संजय निरुपम विरुद्ध मिलिंद देवरा हे दोन गट झाले. या दोघांनाही खासदारकीची संधी मिळाली. आता मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर भाई जगताप असताना त्यांच्या कार्यशैलीविरोधात काँग्रेसचे तरूण आमदार झिशान सिद्दीकी यांनीच तक्रार केली आहे. महाराष्ट्राचे पक्ष प्रभारी एच. के. पाटील मुंबईत तीन दिवस दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासमोर सिद्दीकी हे तक्रारी मांडणार आहेत.

    Mumbai congress new factionalism emergred; Bhai jagtap vs zishan siddiqie

    Related posts

    मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

    Monsoon : मान्सून 4 दिवस आधी 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता; 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक