• Download App
    कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका ; लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय? Mucormycosis fungal infection after recovered from Covid-19 and mostly affects to Those Who are Suffering from Dibetis

    कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका ; लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

    वृत्तसंस्था

    पुणे : कोरोनामुक्त झालेल्या आणि मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींना म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) हा आजार प्रामुख्याने होतो. म्युकोरमायकोसिस हा एक धोकादायक बुरशीचा संसर्ग आहे. तो होण्याची कारणे आणि उपाय.. Mucormycosis fungal infection after recovered from Covid-19 and mostly affects to Those Who are Suffering from Dibetis

    कोरोनापश्चात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या आणि मधुमेहाचा त्रास असलेल्याना हा आजार होतो. यामुळे रुग्णाच्या वरच्या जबड्यात आणि वरच्या जबड्याच्यावर असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये काळसर अशी बुरशी तयार होते. हे म्युकोरमायकोसिस या आजाराची लक्षणं आहेत.

    म्युकोरमायकोसिस म्हणजे काय?

    म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ बुरशीचा संसर्ग आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यामध्ये रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होतो.

    आजार तसा जुनाच आहे

    म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत प्रमाण वाढत आहे.

    mucormycosis, a fungal infection : सावधान ! बुरशीजन्य आजाराचा धोका , तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा ; गुजरातमध्ये 7 जणांनी डोळे गमावले

    म्युकोरमायकोसिस कसा पसरतो?

    म्युकोरमायकोसिस हा श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि अवयवांचे नुकसान करतात. फुफ्फुसातील आणि त्वचेमध्ये या बुरशीचा संसर्गास सुरुवात होते.

    याची लक्षणे कोणती ?

    •  तीव्र डोकेदुःखी
    •  सतत बारीक ताप
    •  गालावर सूज किंवा बधिरपणा
    •  नाक गळणे
    •  हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे
    •  वरच्या जबड्यातील दातांचे हलणे
    •  टाळू आणि नाकातील त्वचा काळसर होणे
    •  जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे

    आजार टाळण्याचे उपाय

    •  तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे किंवा वॉश देणे.
    •  मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टिरॉइड आणि इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करणे.
    •  रोगप्रतिकारशक्ती वाढविणार आहार घ्यावा
    •  लक्षणे आढळल्यास लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपचार करणे.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…