विशेष प्रतिनिधी
मुंबई : मिस्टर इंडिया राहिलेला बॉडी बिल्डर मनोज पाटील याने मुंबईत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहि तीनुसार, मनोजने अभिनेता आणि इन्फ्लूएन्सर साहिल खानला जबाबदार ठरवले आहे. ही सुसाइड नोट ओशिवाराच्या पोलीस ऑफिसरच्या नावाने लिहिण्यात आली आहे. Mr India Manoj Patil Tries To Commit Suicide
या सुसाइड नोटमध्ये मनोजने साहिल खानवर सायबर बुलिंग आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच मनोजने सोशल मीडियावर ऑडिओ पोस्ट केले आहे. मनोज पाटीलला मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मनोज पाटीलचा जन्म 1992 मध्ये झाला. 2016 मध्ये त्याने मिस्टर इंडियाचा किताब आपल्या नावे केला होता.