- पुण्यातील MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं नियुक्ती नसल्यामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात MPSC चा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता हा निकाल लावण्यात आल्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.MPSC RESULT 2019: MPSC exam results announced; Prasad Chowgule of Satara was the first in the state
विशेष प्रतिनिधी
मुंबई: अखेर तब्बल 2 वर्षानंतर 2019 च्या MPSC परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा निकाल प्रलंबित असलेला MPSC चा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. 2019 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र कोरोनाची साथ आली त्यामुळे निकाल लागण्याास उशीर झाला होता. तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्नही होताच त्यामुळे निकाल लागण्यास उशीर झाला. अनेक जणांना पदं मिळाली आणि त्यांच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या.
या परीक्षेचा अंतिम निकाल जवळपास दोन वर्षांनी लागला आहे. ज्यात साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला आला असून मानसी पाटील ही मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे. रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे. रविंद्र शेळके हा परिक्षार्थी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दादासाहेब दराडे याने चौथा क्रमांक पटकावला आहे.
खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागास वर्गातून रोहन कुंवर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच महिला प्रवर्गातून मानसी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.