• Download App
    MPSC : PSI भरतीबाबत मोठा निर्णय; मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत ६० गुण आवश्यकMPSC : Important decision regarding PSI recruitment

    MPSC : PSI भरतीबाबत मोठा निर्णय; मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत ६० गुण आवश्यक

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : राज्यातील MPSC ची तयारी करणार्या आणि PSI होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. MPSC ने PSI भरतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार PSI पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत ६० गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. शारीरिक चाचणीत ६० गुण असतील तरंच विद्यार्थ्यांना मुलाखत देता येणार आहे. आता मैदानी गुण फक्त क्वालिफिकेशनसाठी गृहीत धरले जाणार आहेत, तशी माहिती MPSC ने जारी केलेल्या परिपत्रकात दिली आहे .MPSC : Important decision regarding PSI recruitment

    PSI भरतीसाठी विद्यार्थ्यांना आता MPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मैदानी परीक्षेत ६० गुण आवश्यक असणार आहेत. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना मुखालतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. MPSCच्या २०२० मध्ये निघालेल्या जाहिरातीसाठी हा नियम लागू असणार आहे. तशी माहिती MPSC कडून देण्यात आलीय. यापूर्वी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

    MPSC : Important decision regarding PSI recruitment

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या merit च्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender – Surrender च्या टोप्या!!

    समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करायचा निर्धार!!

    नोबेल पुरस्कार विजेता राज्यकर्ता मुघलांच्या परंपरेला जागला; बांगलादेशाने आपला “बापच” बदलून टाकला!!