• Download App
    MPSC Exam 2022: MPSC परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या परीक्षेच्या तारखा ! MPSC Exam 2022:

    MPSC Exam 2022: MPSC परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या परीक्षेच्या तारखा…

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam 2022) परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. MPSCची 2021साठी राज्यसेवा परीक्षा 2 जानेवारी 2022ला होणार आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२२ वर्षाच्या परीक्षेसाठी अंदाजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.MPSCची 2021साठी राज्यसेवा परीक्षा 2 जानेवारी 2022ला होणार आहे. तसेच 2022ची राज्यसेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे.MPSC Exam 2022

    महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 2021 वर्षाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी आणि मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 आणि 9 मे, 2022 रोजी असेल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे.

    परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक खालील प्रमाणे –

    राज्यसेवा परीक्षा 2021
    पूर्व परीक्षा : दिनांक 2 जानेवारी 2022
    मुख्य परीक्षा : 07, 08 आणि 09 मे 2022

    दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2021
    पूर्व परीक्षा : 12 मार्च 2022
    मुख्य परीक्षा : 02 जुलै 2022

    महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021
    पूर्व परीक्षा : 26 फेब्रुवारी 2022
    मुख्य परीक्षा : 09 जुलै ते 31 जुलै 2022

    महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
    पूर्व परीक्षा : 03 एप्रिल 2022
    मुख्य परीक्षा : 06 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2022

    महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
    पूर्व परीक्षा : 30 एप्रिल 2022
    मुख्य परीक्षा : 24 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2022 दरम्यान

    पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021
    पूर्व परीक्षा : 16 एप्रिल 2022
    मुख्य परीक्षा : 3 जुलै 2022

    राज्यसेवा परीक्षा 2022
    पूर्व परीक्षा : 19 जून 2022
    मुख्य परीक्षा : 15 16 व 17 ऑक्टोबर 2022

    महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
    पूर्व परीक्षा :  08 ऑक्टोबर 2022
    मुख्य परीक्षा : 24 डिसेंबर 2022 ते 14 जानेवारी 2023

    महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
    पूर्व परीक्षा : 5 नोव्हेंबर 2022
    मुख्य परीक्षा : 4 फेब्रुवारी 2023 ते 11 मार्च 2023 दरम्यान

    महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
    पूर्व परीक्षा : 26 नोव्हेंबर
    मुख्य परीक्षा : 18 मार्च ते 23 एप्रिल 2023 दरम्यान होणार

    सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2022
    पूर्व परीक्षा : 10 डिसेंबर 2022
    मुख्य परीक्षा : 30 एप्रिल 2023

     

    MPSC Exam 2022:

    Related posts

    कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; रत्न टाटा कौशल्य विद्यापीठात पहिल्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान

    फडणवीसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळेपर्यंत विरोधक झोपले होते, पण आता त्यांच्यातले “पोपट” बोलायला लागले!!

    फडणवीसांनी “डाव” टाकल्यामुळे पवारांना राज्यसभेची खासदारकी, पण पवारांची महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी!!