विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – लोकजनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज पासवान यांच्याविरुद्ध पोलिसांनी काल बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याबाबत तीन महिन्यांपूर्वी संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. MP Prince Raj paswan will booked for rape case
ती महिला पक्षाचीच कार्यकर्ती आहे. ज्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, त्या महिलेविरुद्ध प्रिन्स राज यांनी १० फेब्रुवारी रोजी खंडणी मागणे आणि ‘ब्लॅकमेलिंग’ करत असल्याची तक्रार दाखल केली होती.
संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार बलात्काराची घटना २०२०मध्ये घडली. याबाबत न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी आदेश दिले होते व कॅनॉट प्लेस पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, मात्र अद्याप कोणाचीही चौकशी करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रिन्स राज हे लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांचे चुलत बंधू आहेत. चिराग यांच्या नावाचाही उल्लेख संबंधित महिलेने तक्रारीत केला आहे. पोलिसांकडे तक्रार देऊ नये म्हणून चिराग पासवान यांनी दबाव आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
MP Prince Raj paswan will booked for rape case
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप
- वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप