MP Police : कोरोना महामारीमुळे देशभरात ठिकठिकाणी कडक निर्बंध देशभर लागू आहेत. अनेक राज्यांत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. रस्त्यावर शांतता आहे, परंतु यादरम्यान असेही काही महाभाग आहेत, जे विनाकारण घराबाहेर पडत आहेत. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात अशा लोकांना अनोखी शिक्षा निश्चित करण्यात आली आहे. येथील पोलीस अधिकाऱ्याने लॉकडाऊन तोडणाऱ्या लोकांना एका वहीवर ‘राम-राम’ लिहिण्याची अनोखी शिक्षा द्यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना यामुळे उपरती होईल, असा यामागे सद्हेतू असल्याचे पोलिसांनी सांगितले. MP Police New Way To Punish violators Of Lockdown by writing Ram Name
विशेष प्रतिनिधी
सतना : कोरोना महामारीमुळे देशभरात ठिकठिकाणी कडक निर्बंध देशभर लागू आहेत. अनेक राज्यांत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. रस्त्यावर शांतता आहे, परंतु यादरम्यान असेही काही महाभाग आहेत, जे विनाकारण घराबाहेर पडत आहेत. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात अशा लोकांना अनोखी शिक्षा निश्चित करण्यात आली आहे. येथील पोलीस अधिकाऱ्याने लॉकडाऊन तोडणाऱ्या लोकांना एका वहीवर ‘राम-राम’ लिहिण्याची अनोखी शिक्षा द्यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना यामुळे उपरती होईल, असा यामागे सद्हेतू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची अनोखी शिक्षा लोकांच्याही पसंतीस उतरली आहे. शिक्षा देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या पैशाने वही खरेदी केली आहे. नियम मोडणाऱ्यांना या पुस्तिकेत चार-चार पाने राम नाम लिहावे लागत आहे.
सब इन्स्पेक्टर संतोष सिंह म्हणाले की, रस्त्यावर विनाकारण जे फिरत आहेत, त्यांना रोखून रामनाम लिहायला लावले जात आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे एक पुस्तिका आहे आणि त्यावर राम नामची दोन-चार पाने लिहायला लावतो. जेणेकरून देवाने त्यांना सुबुद्धी द्यावी. या कोरोना संकटात लोकांनी आपल्या घरीच सुरक्षित राहावे, यासाठी लॉकडाऊन लावले आहे. लोकांना चांगल्या मार्गाने समज यावी म्हणूनच रामनाम लिहायला लावले जात आहे. आम्ही जवळजवळ 30-40 लोकांना रामनाम लिहायला लावले आहे. त्यांनी कमीत-कमी पाच पाने लिहावीत, असा प्रयत्न असतो.
राज्यात कोरोना कर्फ्यूमध्ये वाढ
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्येही कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अविनाश लावनिया म्हणाले की, सद्य:परिस्थिती लक्षात घेता कोरोना कर्फ्यूचा कालावधी वाढविण्यात आला आहे. 17 तारखेला संपणारा कोरोना कर्फ्यू आता 24 मे रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहेत. यासह यापूर्वी आवश्यक सेवांसाठी जी सूट होती, ती पूर्वीसारखीच सुरू राहील.
MP Police New Way To Punish violators Of Lockdown by writing Ram Name
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोरोनावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव, डॉक्टरांच्या मदतीसाठी तयार होईल मनुष्यबळ
- DRDOने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2DG लॉन्च; रिकव्हरी होणार फास्ट, ऑक्सिजनची गरजही कमी
- Narada Sting Case : ममतांचे मंत्री फिरहाद हकीम, सुब्रतो मुखर्जींना सीबीआयने घेतले ताब्यात, नारदा घोटाळ्याप्रकरणी चौकशी
- WHOचा इशारा : उशिरापर्यंत काम करण्याची सवय प्राणघातक, Long Working Hours मुळे हृदयविकारांत वाढ
- Free Import : डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय, 3 प्रकारच्या डाळी आयातीला परवानगी