• Download App
    टाक शेतमाल, घे झटपट पैसे; मध्यदेशात शेतकरी सुखावले; कृषी कायद्याचा फायदा | The Focus India

    टाक शेतमाल, घे झटपट पैसे; मध्यदेशात शेतकरी सुखावले; कृषी कायद्याचा फायदा

    विशेष प्रतिनिधी 

    भोपाळ : मध्यप्रदेशात सुधारित कृषी कायद्याचे फायदे दिसू लागले आहेत. शेतकरी आता कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर माल विकून झटपट पैसेही मिळवू लागले आहेत. कृषी कायद्यानुसार शेतकरी त्यांचा माल बाजार समिती आणि समितीबाहेर विकू शकतो. MP farmers getting benefit of MSP and new farm laws

    मध्यप्रदेशात अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजार समितीबाहेर त्यांना हव्या त्या किंमतीत विकला. त्यामुळे बाजार समितीत 21 टक्के माल कमी आल्याचे सांगण्यात आले.

    कायदा लागू होण्यापूर्वी माल केवळ बाजार समितीतच विकावा हे बंधन होते. त्यामुळे शेतकऱ्यांची घुसमट होत होती. समिती ठरवेल ती किंमत मिळत होती. आता शेतकरी त्याचा माल समितीबाहेर कोणत्याही व्यापाऱ्याला त्याला हव्या असलेल्या किंमतीला विकण्यास मोकळा झाला आहे. ही परिस्थिती मध्यप्रदेशात सध्या आहे. त्यामुळे टाक शेतमाल आणि घे झटपट पैसा, या कृतीमुळे शेतकऱ्याला चांगले दिवस आले आहेत.

    MP farmers getting benefit of MSP and new farm laws

    शेतकरी म्हणाले, शेतमाल बाजार समितीबाहेर विकल्यावर लगेच पैसे मिळतात. त्यामुळे समितीत आता जाण्याची गरजच उरली नाही. शेतमाल विकताना पूर्वी अडचणी येत होत्या. त्या आता दूर झाल्या आहेत.

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!