• Download App
    MOHAN BHAGWAT BIRTHDAY: मेरठमध्ये मुस्लिमांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस केला साजरा MOHAN BHAGWAT BIRTHDAY: Muslims in Meerut celebrate RSS chief Mohan Bhagwat's birthday

    MOHAN BHAGWAT BIRTHDAY: कट्टरपंथियों को हिंदू मुस्लिम को आपस में लड़ाने का मौका नहीं देना चाहिए ; मेरठमध्ये मुस्लिमांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस केला साजरा

    विशेष प्रतिनिधी 

    मेरठ:मेरठमध्ये शनिवारी राष्ट्रीय हिंदू मुस्लिम एकता मंचच्या बॅनरखाली मुस्लिम समाजातील लोकांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस साजरा केला. कमिशनरेट पार्कमध्ये केक कापून त्याांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .MOHAN BHAGWAT BIRTHDAY: Muslims in Meerut celebrate RSS chief Mohan Bhagwat’s birthday

    राष्ट्रीय मुस्लिम एकता मंचचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद रिहान खान, परवेझ अली, शाहनवाज खान, तबस्सुम अन्सारी यांनी केक कापून आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस आयुक्तालय उद्यानात साजरा केला. 

    या दरम्यान मुस्लिम महिला आणि इतर लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोहम्मद रिहान खान म्हणाले की, संघप्रमुखांनी गेल्या काही वर्षांत मुस्लिमांसाठी दाखवलेली सहानुभूती कौतुकास्पद आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले होते की, आपल्या भारतीयांचा एकच डीएनए आहे. भारतात अनेक धर्म गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रत्येक धर्म वेगळा असला, हिंदू- मुस्लिम यांची किंवा अन्य धर्मियांची प्रार्थना पद्धती वेगळी असली तरी भारतातील सर्व धर्मातील लोकांचा डीएनए एकच आहे, सर्व धर्मीय भारतीय नागरिक असून त्यांची संस्कृती पूर्वापार एकच आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले होते .

     

    यामुळे मुस्लिमांमध्ये एक चांगला संदेश  जाईल आणि हिंदू मुस्लिमांमधील अंतर हळूहळू संपेल.हे लक्षात घेऊन मंचाने पुढाकार घेतला आणि संघप्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी म्हटले की आपण आपल्या देशातील चांगल्या लोकांचे कौतुक केले पाहिजे आणि कट्टरपंथीयांना हिंदू आणि मुस्लिम यांच्यात भांडण लावण्याची संधी देऊ नये. 

    MOHAN BHAGWAT BIRTHDAY: Muslims in Meerut celebrate RSS chief Mohan Bhagwat’s birthday

    Related posts

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!

    Kangana Ranaut : तरुणांना राष्ट्रपतींचे नाव सांगता न आल्याने कंगना रनोट संतापल्या; युद्ध नव्हे टोळांसारखा मेंदू असलेली पिढी नक्कीच नाश करेल!

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय