• Download App
    सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकसाठी मोदी सरकारकडून 4500 कोटींचे कर्ज मंजूर ; लस उत्पादनास गती! Modi government approves Rs 4,500 crore loan for Serum Institute of India and Bharat Biotech; Speed ​​up vaccine production

    सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकसाठी मोदी सरकारकडून ४५०० कोटींचे कर्ज मंजूर ; लस उत्पादनास मिळणार गती

    • ‏आत्मनिर्भर भारत मिशन 3.0 अंतर्गत चालवल्या जाणार्या मिशन कोविड सुरक्षेच्या माध्यमातून स्वदेशी लस निर्मितीस वेग देण्यासाठी आर्थिक मदत करण्याची तरतूद.

    • वित्त मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (एसआयआय) 3000 कोटी रुपये आणि भारत बायोटेकला 1,500 कोटी रुपये देण्याचे म्हटले आहे. 

    • पुन्हा एकदा कोरोनाची लस निर्मिती सुरूModi government approves Rs 4,500 crore loan for Serum Institute of India and Bharat Biotech; Speed ​​up vaccine production

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोविड -19 लस उत्पादक भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) यांना पतपुरवठा करण्यास अर्थ मंत्रालयाने सोमवारी मान्यता दिली. सरकारच्या तात्विक मंजुरीनंतर वित्त मंत्रालय ही रक्कम आरोग्य मंत्रालयाला देईल. याबाबत अधिकृत आदेशही लवकरच देण्यात येतील. संबधित रक्कम मिळाल्यानंतर आरोग्य मंत्रालय एसआयआय आणि भारत बायोटेकला देतील.

    भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता या दोन्ही स्वदेशी लसींची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मोदी सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.


    मंत्रालयाने सीरमसाठी 3,000 कोटी आणि भारत बायोटेकसाठी 1,500 कोटी रुपयांचे क्रेडिट दिले आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की पैसे लवकरात लवकर दिले जातील. मंत्रालयाचा निर्णय एसआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी कोविड -19 लस उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी सरकारला 3000 कोटी रुपयांच्या अनुदानाची विनंती केल्याच्या काही दिवसानंतर आला आहे.

     

     

    सीरम इन्स्टीट्यूटला आपल्या लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी 3 हजार कोटी रूपयांची गरज असल्याची माहिती सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली होती.

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी कोविड -19 व्यवस्थापनावरील देशातील विविध उद्योग मंडळाशी चर्चा केली. साथीच्या या रोगादरम्यान, लोकांचे जीवन वाचविण्यासाठी केंद्र सरकार काम करत राहील.

    Modi government approves Rs 4,500 crore loan for Serum Institute of India and Bharat Biotech; Speed ​​up vaccine production

     

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!